मुंबई, दि. १८ सप्टेंबर २०२६ : सामाजिक न्याय मंत्री मा. संजयजी शिरसाट यांची भेट घेऊन भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाच्या जागेसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे आणि सर्जेरावभाऊ वाघमारे उपस्थित होते.
विजयस्तंभाच्या विकासकामांना गती मिळावी यासाठी ₹१०० कोटींचा निधी तातडीने जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यासंदर्भात मंत्री महोदयांकडे पत्रव्यवहारही करण्यात आला.
तसेच, १ जानेवारी २०२७ रोजी होणाऱ्या शौर्य दिनाच्या शताब्दी महोत्सवाच्या नियोजनाबाबत मंत्री संजयजी शिरसाट यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. शौर्य दिनाचा शताब्दी महोत्सव व्यापक स्वरूपात आयोजित करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.
यावेळी मंत्री महोदयांनी संबंधित सर्व बाबी लवकरच मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन दिले. तसेच १ जानेवारी २०२७ रोजीचा शौर्य दिन शताब्दी महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या विकासकामांना तसेच शौर्य दिनाच्या शताब्दी महोत्सवाच्या आयोजनाला पुढील काळात गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Post a Comment
0 Comments