Type Here to Get Search Results !

पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत विविध विषयांना मंजूरी




पनवेल महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा दिनांक 29सप्टेंबर रोजी महापालिका मुख्यालयात स्थायी समिती सभापती बबन मुकादम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी विविध विषयांना मंजूरी देण्यात आली.


यावेळी स्थायी समिती सदस्य, आयुक्त मंगेश चितळे, अतिरीक्त आयुक्त 1 गणेश शेटे, अतिरीक्त आयुक्त 2 महेशकुमार मेघमाळे, सचिव नानासाहेब कामठे, उपायुक्त डॉ.वैभव विधाते, उपायुक्त स्वरूप खारगे, मुख्य लेखाधिकारी पूनम पाटील शहर अभियंता राजेश कर्डिले,उपसचिव अक्षय कदम, महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


यावेळी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांवर व महापालिका मालकीच्या मोकळया भुखंडावर वार्षिक तत्वावर माहिती दर्शक फलक बसवणे (२ वर्षाकरीता). या कामाच्या २nd सकारात्मक वा नकारात्मकला मान्यता मिळण्याबाबतचा विषयाला स्थायी समितीने मंजूरी दिली.


 पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती ब, कळंबोली धारण तलाव येथे पंपिंग स्टेशन बांधणे व इतर अनुषंगिक उपाययोजना करणेबाबतच्या विषयाला स्थायी समितीने मंजूरी दिली.


पनवेल महानगरपालिका हद्दीतील खारघर- कोपरा प्लॉट-२५, सेक्टर-१५ येथील भूखंडाला संरक्षण भिंत बांधणे तसेच विरंगुळ केंद्र इमारतीवर शेड उभारणे व त्या अनुषंगाने इतर कामे करणच्या विषयाला स्थायी समितीने मान्यता दिली.

 पनवेल महानगरपालिकेकडून राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी दोन वर्षाकरीता विद्युत उपकरणे व विद्युत व्यवस्था भाडेतत्वावर उपलब्ध करुन देणे या कामाअंतर्गत अंतिम देयक अदा करणेकरीता झालेल्या खर्चास मान्यता मिळणेबाबतच्या विषयाला स्थायी समितीने मंजूरी दिली.


 पनवेल महानगरपालिकेमार्फत राबविणेत येणारे जयंती उत्सव, साजरे करणेत येणारे सण व विविध कार्यक्रमा निमित्त इमारती, रस्ते, चौक व स्मारक या ठिकाणी तीन वर्ष कालावधीकरीता भाडेतत्वावर आकर्षित विद्युत रोषणाई उपलब्ध करुन देणे या कामाची न्यूनतम निविदेस मान्यता मिळणे बाबतच्या विषयाला स्थायी समितीने मंजूरी दिली.


 पनवेल महानगरपालिका क्रिकेट अकॅडमी येथे सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा यंत्रणा बसविणेबाबतच्या विषयाला स्थायी समितीने मान्यता दिली.


 पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सिडकोने विकसीत केलेल्या खारघर नोडमधील मलनिःस्सारण वाहिन्यांची दोन वर्ष कालावधीकरीता आवश्यकतेप्रमाणे दुरुस्ती, सुधारणा व नुतनीकरण करणे या कामाच्या सुधारित प्रशासकीय खर्चास मान्यता मिळणेबाबतच्या विषयाला स्थायी समितीने मान्यता दिली.


पनवेल महानगरपालिका हद्दीतील कामोठे सेक्टर-३२ येथील ८५ एम.एल.डी. क्षमतेच्या मलप्रक्रिया केंद्राचे सिडकोने नियुक्त केलेले ठेकेदारामार्फत "परिचलन, देखभाल व दुरुस्ती पनवेल महानगरपालिकेमार्फत नविन ठेकेदाराची नियुक्ती होईपर्यंत वाढीव मुदतीबाबतच्या विषयाला स्थायी समितीने मान्यता दिली.


पनवेल महानगरपालिका क्षेत्रात यांत्रीकी पध्दतीने धुरीकरण व फवारणी सेवा पुरविणे बाबतच्या विषयाला स्थायी समितीने मान्यता दिली.


पनवेल महानगरपालिका हद्दीतील दैनंदिन रस्तेसफाई. नालेसफाई व इतर अनुषंगिक कामासाठी मनुष्यबळाचा पुरवठा करणेकामी मुदतवाढ देणेबाबतच्या विषयास स्थायी समितीने मंजूरी दिली

 पनवेल महानगरपालिका हद्दीत विशेष सखोल स्वच्छता मोहीम राबविणेबाबत विषयाला स्थायी समितीने मान्यता दिली

 पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील (पनवेल शहर वगळता) २९ गावांकरीता ३ वर्षाकरीता पाणी पुरवठा योजनेची दैनंदिन देखभाल व निगा दुरूस्ती करणेबाबतच्या विषयाला स्थायी समितीने मान्यता दिली.


पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील पनवेल शहरातील पाणीपुरवठा योजनेची निगा व दुरुस्ती (2+1) = 3 वर्षाकरीता करणेबाबतच्या विषयाला स्थायी समितीने मान्यता दिली.

Post a Comment

0 Comments