Type Here to Get Search Results !

समाजात बौद्ध विवाह संस्कार बौद्ध लोक आतातरी रूजवणार का बरेच दिवसापासून मी बौद्ध विवाह पध्दत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला कशी सांगितली नाही हे शोधत होतो तीचा अखेर शोध लागला


मनुष्य जिवनात विवाह हा एक महत्वपूर्ण संस्कार आहे. आपण बुद्ध धम्माची दिक्षा घेतली. त्यामुळे आपल्या मुलाबाळांचे विवाह प्रमाणित बौद्ध विवाह पध्दतीने अगदी साध्या रितीने व्हावे असे मत सुप्रसिद्ध लेखक, संपादक तथा प्रकाशक आणि तामीळनाडू राज्याचे मुख्य सचिव म्हणून सेवानिवृत्त झालेले आय.ए.एस. अधिकारी विश्वनाथ शेगावकर यांनी आपल्या बुद्ध धम्म संस्कार पाठ या पुस्तकात व्यक्त केले आहे. 


     ते म्हणतात, स्वतः महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध लोकांचे विवाह कसे काय पार पाडले जावे, याबाबत ४ डिसेंबर, १९५६ च्या एका पत्रात स्वतःच्या एका हस्ताक्षरात बौद्ध समाजाला मार्गदर्शन केले आहे.


      डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ते पत्र मुंबईच्या सिद्धार्थ काँलेजचे प्राध्यापक व्हि.एस.कर्डक यांना लिहिले होते. ते पत्र असे प्रिय कर्डक आपले १२ नोव्हेंबर १९५६ रोजीचे पत्र मिळाले. बोद्ध विवाह विधी साधा-सुधा असतो. त्यात होम नाही आणि सात फेरेही नाहीत. ह्या विधीत सर्वात महत्त्वाची बाब वधू आणि वर यांच्या मध्यभागी एका स्टूलावर काठोकाट भरलेले एक मातीचे कोरे भांडे ठेवावे व पाण्याने भरलेल्या या भांड्याच्या एका बाजूला वधूने तर दुसऱ्या बाजूला वराने उभे राहावे. त्या काठोकाट भरलेल्या भांड्यात ठेवलेल्या कापसाच्या धाग्याचे एक टोक वधूच्या हाती द्यावे, तर दुसरे टोक वराच्या हाती द्यावे. कोणी एका व्यक्तीने मंगळ सुत्ताचे गायन करावे. बौद्धाचार्यांनी किंवा भिख्खूनीच केले पाहिजे असे नाही. वधू आणि वराने पाढरेशुभ्र वस्त्र परिधान करणे अनिवार्य ठरते. म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या महापरिनिर्वाण दिनाच्या जवळपास ३० तासापूर्वी बौद्ध विवाह पध्दती बाबत समाजाला मार्गदर्शन करणारे पत्र लिहिले होते.


       विश्वनाथ शेगावकर यांनी आपल्या बुद्ध धम्म संस्कारपाठ या पुस्तकात अशी अपेक्षा व्यक्त केली की, आतातरी समाजाने डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुचविलेल्या पद्धतीनुसार अगदी साध्या रितीने बौद्ध विवाह संपन्न करावेत. त्यात भपकेबाजपणा किंवा कुठल्याही प्रकारच्या बडेजावपणाला वाव नसावा. तसेच विवाहात वधू-वर यांनी बाशिंग बांधू नेये,नारळाचा वापर करू नये, पत्रिकेवर बुद्धवासी किंवा स्वर्गीय शब्द वापरू नये,चि.का.सौ. किंवा ची. हे शब्द लिहू नये तर आयुष्यमान, आयुष्यमती या शब्दाचा वापर करावा. तसेच हळदीचा वापर हळदी समारंभ खेळू नये. आणि उपोसथाच्या दिवशी म्हणजे महापुरूषांची जयंती, प्रजासत्ताक दिन, पौर्णिमा, आमावस्या, आष्टमी या दिवशी विवाह कधी ठेऊ नये. 


       मात्र अजूनही बौद्ध विवाह विधीत एकवाक्यता नसून तिचे प्रमाणीकरण झाले नाही. जो तो विधीकर्ता आपापल्या आकलनानुसार विवाह विधी पार पाडतो. वास्तवात त्रिसरण, पंचशील, बुद्ध, धम्म व संघ वंदना, बावीस प्रतिज्ञा वाचन आणि मंगल सुत्ताच्या गाथा म्हणून विवाह संपन्न केल्यास अरध्या तासात विवाह विधी संपतो. मात्र विधीकर्ते वेगवेगळ्या गाथा घेतात, काहिजन फार लांलचक तर काही अगदी थोडक्यात हा वीधी आटोपता घेतात. सुत्तपठणाचे वेळी संगीत किंवा वाद्यांची साथ घेऊ नये. पण बरेच विधीकर्ते संगीयमय पद्धतीने विवाह लावण्यात धन्यता मानतात. विषेश म्हणजे विवाह विधीच्या वेळचे तर बंधनच पाळले जात नाही. त्यातही इतर सोपस्कार करण्यात एवढा वेळ जातो की, उपस्थित लोक कंटाळून जातात. त्यामुळे ते विधी लावणाऱ्या व्यक्तीला थोडक्यात अटपा अशा सूचना करून विधी पार पाडायला लावतात. म्हणजे त्यात पावित्र्य आणि गांभीर्य अजिबात राहत नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे.


      अलीकडे समाजात विवाह विधी बाबत फारशी गंभीरता राहिली नसून बडेजावपणा करण्याचा कल वाढलेला दिसून येतो. त्यामुळे विवाह विधीचा एक सोपस्कार कसा तरी पार पडला तरी चालते. पण आम्ही किती थाटात व आतिषबाजी करीत विवाह केला हेच जास्त महत्त्वाचे वाटते. त्यामुळे लग्न फार उशीरा लावण्याची प्रथाच निर्माण झाली असे दिसते. बरे विवाह लावणारे बौद्धाचार्य किंवा भंते उशिरा लग्न लावण्यावर बोलत नाहीत. त्यामुळे हौस, मौज, मस्ती, नाचणे, डी.जे. वाजवणे हे झालेच पाहिजे नाहीतर लग्नाची मजा कशी येणार? त्यामुळे यावर कोणी बोलतच नाही. 


     सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, आपल्या देशात कायद्याने एक विवाह पध्दती स्विकारली आहे. त्यामुळे विवाह एकच वेळी होतो हे जरी खरे असले तरी तो वेळेत व प्रमाणित संस्कारानुसार व्हावा. पण याचा विचारकेला जात नाही.


      खरे पाहिले तर विवाह हे ऋणानुबंधाचे पवित्र नाते आहे. ते नाते वधू-वर यांच्यातच नव्हे तर दोन कुटुंबात आणि समाजात देखील महत्त्वाचे असते. त्यामुळे दोन्ही कुटुंबानी या विवाह संस्कार विधीचे पावित्र्य कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. परस्पर मानसन्मान राखला पाहिजे. आम्ही मुलाकडचे म्हणून श्रेष्ठ व तुम्ही मुलीकडचे म्हणून कनिष्ठ हे जे भेदाभेद करणारे समीकरण आहे ते मोडीत काढून बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयाई म्हणून समानता हे तत्व सर्वांनी जोपासले पाहिजे. पण अलीकडे समाजात असे नाते जोपासण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टिंवरून संबंधात दुरावा निर्माण होऊन घटस्पोटाचे प्रमाण वाढले आहे. बहुसंख्य विवाह हे केवळ गैरसमज, अहंकार, वैचारिक मतभेद आणि हुंडा या कारणाने तुटतात. कारण आमच्या समाजात संयम, मानुसकी, विवाह संस्काराची पवित्रता व नैतिकता यांचा फार मोठा अभाव असून फालतू रूढी, प्रथा व परंपरा कायम आहेत. परिणामी शिक्षित, उच्चशिक्षित कुटुंबात आणि मुलामुलींमध्ये बेबनाव होऊन टोकाची भूमिका घेतली जाते.


      भारतात हिंदू विवाह कायदा १९५५ नुसार घटस्फोट घेण्याचा कायदेशीर अधिकार आहे. पण त्याची कारणमीमांसा ही फारच अनुचित, अनैतिक व अवैचारिक असते हे आपण लक्षात घेतले पाहिजे. फारच गंभीर व टाळता न येणारे कारण असेल तर घटस्फोट घेतलाच पाहिजे. पण घटस्फोट ही विवाह संस्काराचे पावित्र्य नष्ट करणारी आणि समाजाच्या सामाजिक स्वास्थ्यासाठी फार घातक बाब आहे याची जाणीव समाजाने ठेवली पाहिजे हिच अपेक्षा व सदिच्छा 


*☝🏻वि.ता.क.;सन्मा.प्रा.डॉ. एम आर इंगळे यांची सोशल मिडियावरुन प्रसारित झालेली एक चिकित्सक पोस्ट आमचे धम्म बंधु सन्मा.संतोष तांबे - कांदीवली पू.मुंबई यांच्या वाॅलवरुन वाचकांसाठी साभार.*

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


*🗣️प्रसारक,*

*👉🏻द्रौपदीपुत्र दीपक धाकु गायकवाड*

*🎯संविधान साक्षरता अभियान*

*🎯दक्ष मुंबईकर समिती DMS*

Post a Comment

0 Comments