Type Here to Get Search Results !

अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व फ्रीशिप योजनांचा लाभ घ्या !


महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. विद्यार्थ्यांनी या योजनांची माहिती घेऊन पात्रतेनुसार लाभ घ्यावा, असे आवाहन समाजकल्याण आयुक्त, पुणे दिपाली मुधोळ मुंडे यांनी केले आहे.


✅ भारत सरकार पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना (MahaDBT)

कौटुंबिक वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि निर्वाह भत्ता देण्यात येतो.


✅ फ्रीशिप योजना (Freeship)

कौटुंबिक वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काचा लाभ देण्यात येतो.


दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांसाठी या योजनांअंतर्गत पात्रतेनुसार अर्ज करता येतो. भारत सरकार पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचा दरवर्षी सुमारे चार लाख विद्यार्थी लाभ घेतात.


📲 शिष्यवृत्ती योजनांची सविस्तर माहिती जाणून घ्या, पात्रतेचे निकष तपासा आणि महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून योजनांचा लाभ घ्या.

https://www.facebook.com/share/r/1J6Kvzsf3Q/

Post a Comment

0 Comments