7
मुंबई १७ ऑक्टोबर : महाडच्या ऐतिहासिक क्रांतिभूमीत, बौद्धजन पंचायत समिती महाड शाखेच्या वतीने आयोजित चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त विद्यार्थी गुणगौरव आणि कार्यकर्ता प्रशिक्षण सोहळ्यास उपस्थित राहिलो.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन दिले, तसेच एकदिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन केले.
महाडचा ऐतिहासिक संघर्ष हा समता, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायासाठी लढण्याची प्रेरणा देणारा वारसा आहे. आजच्या युवा पिढीने बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून शिक्षण, आधुनिक ज्ञान आणि वैचारिक प्रगल्भतेच्या बळावर समाजपरिवर्तनासाठी पुढाकार घ्यावा.
विद्यार्थ्यांनी आपली क्षमता सिद्ध करावी आणि युवा कार्यकर्त्यांनी आंबेडकरी चळवळीचा विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी संघटनात्मक व वैचारिकदृष्ट्या सक्षम व्हावे अशी भूमिका ह्यावेळी मांडली.
महाडच्या संघर्षातून प्रेरणा घेत बाबासाहेबांचा विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे, युवकांना शिक्षण आणि संघटनेच्या माध्यमातून सक्षम करणे व सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याला नवी दिशा देणे, हाच माझी संकल्प आहे.
जय भीम! जय बुद्ध! जय संविधान!
#DrBabasahebAmbedkar #AmanAmbedkar #MahadSatyagraha #Republicansena



Post a Comment
0 Comments