Type Here to Get Search Results !

पंतनगर महानगरपालिका मराठी शाळा क्र. 2 च्या खाजगीकरणाविरोधात सकल मराठी समाजाचे जनआंदोलन – सर्वपक्षीय मराठी माणूस एकवटला

 


मुंबई, 30 मे 2026, सायं. 6 वाजता* – मुंबई महानगरपालिकेच्या घाटकोपर पंतनगर येथील *मराठी शाळा क्र. 2* चे खाजगीकरण करण्याच्या प्रस्तावाविरोधात *सकल मराठी समाज, घाटकोपर* यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या जनआंदोलनाला आता सर्वपक्षीय व सामाजिक स्तरातून मोठा पाठिंबा मिळत आहे.पक्ष बाजूला ठेवून मराठीसाठी एकजूट या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे पक्ष बाजूला ठेवून सर्व पक्षातील मराठी माणूस शाळा वाचवण्यासाठी एकवटला आहे. राजकीय मतभेद विसरून स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक एकाच व्यासपीठावर आले आहेत.

स्वरराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. संदीप अंकुश राणे तसेच ज्येष्ठ पत्रकार श्री. प्रशांत बढे यांनी हे प्रकरण प्रथम उजेडात आणले. त्यांच्या पुढाकारानेच जनजागृती होऊन आंदोलनाला गती मिळाली.

महापालिका प्रशासनाने पीपीपी तत्त्वावर शाळा चालवण्यासाठी खाजगी संस्थेला देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या निर्णयामुळे गरीब व कामगार कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येणार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

जनआंदोलनाच्या प्रमुख मागण्या:

1. शाळा क्र. 2 चे खाजगीकरण तात्काळ रद्द करा.

2. शाळेच्या पायाभूत सुविधांचा विकास महापालिकेनेच करावा.  

3. शिक्षक व कर्मचारी भरती करून महापालिकेनेच मराठी शाळा सक्षम करा.  

4. मराठी माध्यमाच्या शाळा टिकवण्यासाठी स्वतंत्र धोरण जाहीर करा.


भव्य मोर्चा व सामाजिक एकजूट

यासाठी सकल मराठी समाजाच्या वतीने *शाळेपासून घाटकोपर स्टेशनपर्यंत भव्य मोर्चा* काढण्यात आला. यावेळी शेकडो पालक, विद्यार्थी व नागरिक सहभागी झाले होते. 

या प्रश्नावर सर्व सामाजिक संस्था एकत्रित आल्या आहेत. माजी विद्यार्थी मंडळ तसेच विविध राजकीय पक्षांच्या स्थानिक शाखांनी सक्रिय पाठिंबा दिला.

स्वाक्षरी मोहीम राबवून हजारो नागरिकांनी खाजगीकरणाला विरोध नोंदवला. 



स्वरराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री संदिप अंकुश राणे तसेच ज्येष्ठ पत्रकार श्री प्रशांत बढे यांनी ह्या प्रकरणाला वाचा फोडली 

संदीप राणे म्हणाले

_"शाळा ही वास्तू नाही, ती पिढ्या घडवणारी संस्कृती आहे. खाजगीकरण म्हणजे मराठी भाषेच्या मुळावर घाव आहे. हा लढा फक्त शाळेसाठी नाही, तर अस्मितेसाठी आहे."_


प्रशांत बढे यांची प्रतिक्रिया:

_"प्रशासनाने गुपचूप प्रस्ताव आणला. पण मराठी माणूस जागा झाला आहे. पक्ष, संघटना विसरून आता सगळे एका झेंड्याखाली आलो आहोत – मराठी शाळा वाचवण्याच्या झेंड्याखाली."_


पुढील इशारा:

प्रशासनाने प्रस्ताव मागे न घेतल्यास आंदोलन अजुन व्यापक करण्याचा निर्णय घेण्यात आला.


मराठी शाळा वाचवा, पिढी घडवा!

शिक्षण विकणे बंद करा!* ✊📚


---  

Post a Comment

0 Comments