Type Here to Get Search Results !

कोंडये येथे भीमशक्ती विकास मंडळ व माता रमाई महिला मंडळ यांचा संयुक्त जयंती महोत्सव उत्साहात संपन्न

 कोंडये, ता. लांजा, जि. रत्नागिरीभीमशक्ती विकास मंडळ कोंडयेग्रामीण मुंबई विभाग तसेच माता रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १६ १७ मे रोजी मौजे कोंडये येथे संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात सामाजिक ऐक्याच्या भावनेतून साजरा करण्यात आलादोन दिवस चाललेल्या या महोत्सवात सामाजिक, सांस्कृतिक प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.   १६ मे दिवशी समाजप्रबोधनासाठीआंबेडकर वर्सेस आंबेडकरहे नाटक सादर करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागर करणाऱ्या या नाटकाला ग्रामस्थांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला१७ मेमहिला विशेष कार्यक्रम माता रमाई महिला मंडळाच्या वतीने महिलांसाठीहोम मिनिस्टरया उत्कंठावर्धक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुजा जाधव यांनी केले. चुरशीच्या स्पर्धेत वैभवी कांबळे प्रथम क्रमांक विजेत्या ठरल्या असुन दुसरा क्रमांक वैदेही कांबळे आणि तिसरा क्रमांक स्वाती जाधव  यांचा आला .सांस्कृतिक आणि गौरव सोहळामहोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी राजेश जाधव, दीपराज कांबळे, राजेश कांबळे, गणपत कांबळे धनराज कांबळे यांनी आपल्या सुमधुर भीमगीतांच्या सादरीकरणाने वातावरणात चैतन्य निर्माण केले. यावेळी गावातील गुणवंत शालेय विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आलाविविध नृत्य, डान्स सांस्कृतिक कार्यक्रमांनी महोत्सवाची रंगत अधिकच वाढवली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहन कांबळे यांनी केले सर्व महिलांचा सन्मान चिन्ह  देऊन सत्कार करण्यात आलाया महोत्सवात कोंडये गावातील नागरिक, युवक, महिला लहान मुलांनी मोठ्या संख्येने उत्साहाने सहभाग नोंदवलाभीमशक्ती विकास मंडळग्रामीण मुंबई विभाग आणि माता रमाई महिला मंडळ यांच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन अतिशय सुंदर, प्रेरणादायी यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन केले


Post a Comment

0 Comments