Type Here to Get Search Results !

शिक्षण वाचवण्याची लढाईच नव्हे तर नेहमी सेविकांच्या न्यायासाठीही उभा आहे ! - कामगार नेते रमेश मारुती जाधव

 

दिनांक २६ मे २०२६ रोजी बालवाडी सेविका तथा शिक्षक मदतनीस यांच्या प्रश्नावर झालेल्या हेरिंगमध्ये पुन्हा एकदा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील गचाळ आणि बेजबाबदार कारभार उघड झाला. ज्या महिला दिवस-रात्र वस्त्यावस्त्यांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी मेहनत घेतात, त्या सेविकांवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांना आज जाब विचारण्यात आला.माननीय बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाची आणि चुकीच्या कामकाजाची गंभीर बाब लेखी स्वरूपात निदर्शनास आणून देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना देखील सुरू असलेल्या हेरिंगबाबतचा संपूर्ण कारभार आयुक्तांना कळवावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले.महत्त्वाची बाब म्हणजे —३० एप्रिल २०२६ रोजी संस्थांची मुदत संपलेली असताना कामगार आयुक्त कार्यालयाची परवानगी आणि आवश्यक नोंदणी प्रमाणपत्राशिवाय पुढे कोणत्याही संस्थांना नियुक्त्या देऊ नयेत, याबाबत ठोस चर्चा झाली. तसेच कामावरून काढण्यात आलेल्या सर्व सेविकांना पुन्हा कामावर घेण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट समज देण्यात आली.या चर्चेनंतर शिक्षण विभागातील सेविका तथा शिक्षक मदतनीस यांच्यामध्ये नव्या आशेचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून “आता न्याय मिळेल” असा विश्वास त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला.

📚 शाळा वाचवण्यासाठी आमचा लढा सुरूच आहे...

पण शाळा वाचवण्यासाठी घराघरांत जाऊन विद्यार्थी गोळा करणाऱ्या प्रत्येक माऊलीला न्याय मिळालाच पाहिजे, यासाठी देखील आमचा संघर्ष तितक्याच ताकदीने उभा आहे !

🔥 अन्याय करणाऱ्यांना जाब विचारल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही!

— कामगार नेते रमेश मारुती जाधव

अध्यक्ष, श्रमिक भारतीय युनियन

सरचिटणीस, E.A.R.T.H & Peoples Comm

ittee Foundation



Post a Comment

0 Comments