आजही मे महिन्यात कोकणातील गावे, वाड्या आणि रस्ते कोकणकरांनी फुलून जातात. मुंबई, पुणे आणि जगभरातील कोकणवासी आपल्या मातृभूमीकडे धाव घेतात.पण थोडे बारकाईने आपल्या गावाकडे पहा...
• गावातील शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या १० ते २० टक्क्यांवर आली आहे.•
गावात राहणारे तरुण जवळजवळ दिसेनासे झाले आहेत.•
अनेक गावे आजी-आजोबांच्या वृद्धाश्रमात बदलत आहेत
.• शेकडो एकर जमिनी विक्रीसाठी बाहेर पडत आहेत.
• गावाबाहेर नवीन उद्योग, दुकाने, मॉल, बेकरी आणि व्यवसाय उभे राहत आहेत; पण त्यांचे मालक बहुतेक स्थानिक नाहीत
.• परप्रांतीय कुटुंबांची संख्या हळूहळू वाढत आहे.• आलिशान घरे उभी आहेत, पण त्यात राहणारी माणसे नाहीत.
आज आपल्याला महामार्ग मिळाला...वेगवान रेल्वे मिळाल्या...पायाभूत सुविधा मिळाल्या...
पण प्रश्न असा आहे की...
हा विकास अनुभवायला आणि पुढच्या पिढीकडे सोपवायला आपल्या गावात माणसे उरतील का?
मी मांडलेली परिस्थिती तुमच्या गावात खरी नसेल तर तुमचे विशेष अभिनंदन!
पण जर ती खरी असेल, तर आता एकत्र येऊन विचार करण्याची वेळ आली आहे.
कोकणातील तरुण पुन्हा गावात कसे येतील?रोजगार आणि उद्योगनिर्मिती कशी वाढेल?जमिनी आणि स्थानिक मालकीचे संरक्षण कसे होईल?कोकणाची लोकसंख्या, संस्कृती आणि ओळख कशी टिकवायची?
आपल्या सूचना, मते आणि अनुभव जरूर सांगा.
तुमच्या गावाची खरी परिस्थिती सर्वांसमोर मांडा.
संजय यादवराव शिवस्वराज्य मराठी लोक चळवळकोकण भूमी प्रतिष्ठान ग्लोबल कोकण
कार्यालय :छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर,मुख्य एन्ट्री, शेवटचे टोक दुसरा मजला,दादर पश्चिम
संपर्क :9004075995
8779842009
9082550774

Post a Comment
0 Comments