मुंबई: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पनवेल शाखेच्या वतीने 31 मे 2026 रोजी खांदा कॉलनी येथील आगरी शिक्षण संस्थेत एक दिवसीय संवाद शिबिर घेण्यात आले.
प्रमुख मार्गदर्शक राज्य सरचिटणीस आरती नाईक, जिल्हा प्रधान सचिव महेंद्र पाटेकर यांनी बुवाबाजी विरुद्ध वैज्ञानिक दृष्टिकोन, अंनिसची पंचसूत्री व कार्यकर्त्याच्या भूमिकेवर मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे गटचर्चा, खेळ व चळवळीच्या गाण्यांतून प्रबोधन करण्यात आले . पनवेल, नवी मुंबईतील तरुणांचा मोठा सहभाग होता. प्रमुख उपस्थिती राहणार मान्यवर प्रियांका खेडेकर, मनोहर तांडेल, प्रा. राम गोसावी हे होते आणि सूत्रसंचालन पूजा गोसावी यांनी केले.

Post a Comment
0 Comments