Type Here to Get Search Results !

३० जूनच्या मुंबई महामोर्चात पीपल्स रिपब्लिकन पार्टीची दमदार उपस्थिती; राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार


 

मुंबई, दि. ३० जून : उपवर्गीकरणाच्या विरोधात मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या महामोर्चात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे हजारो कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. 

लॉगमार्च प्रणेते, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा प्रा. जोगेंद्र कवाडे सर व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपजी कवाडे यांच्या नेतृत्वाखाली व उपस्थितीत हा सहभाग नोंदविण्यात येणार असून, मुंबईत पक्षाची ताकद आणि एकजूट पाहायला मिळणार आहे.

या महामोर्चासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतून कार्यकर्ते, पदाधिकारी, युवक, महिला व आंबेडकरी समाज मोठ्या उत्साहाने मुंबईकडे रवाना होत आहेत. सामाजिक न्याय, संविधानाचे संरक्षण आणि उपवर्गीकरणाच्या विरोधातील भूमिका अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी या मोर्चात सक्रिय सहभाग घेणार असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपजी कवाडे यांनी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आंबेडकरी जनतेला शिस्तबद्ध पद्धतीने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. ३० जून रोजी मुंबईत पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांची दमदार उपस्थिती राज्याच्या राजकीय व सामाजिक पटलावर लक्षवेधी ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.



Post a Comment

0 Comments