Type Here to Get Search Results !

अनुसूचित जातींमधील आरक्षण उपवर्गीकरणाविरोधातील विराट महामोर्चा ऐतिहासिक; भीम आर्मीचा सक्रिय सहभाग

 मुंबई :दि.३० जून २०२६   रोजी मुंबई येथे आज अनुसूचित जातींमधील आरक्षण उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी काढण्यात आलेला विराट महामोर्चा ऐतिहासिक आणि अभूतपूर्व ठरला. राज्यभरातून लाखो आंबेडकरी अनुयायी, विविध अनुसूचित जातींचे समाजबांधव, सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आरक्षण उपवर्गीकरणाला तीव्र विरोध दर्शविला.महामोर्चामध्ये आदरणीय आयु. आनंदराज आंबेडकर साहेब, आदरणीय आयु. भीमराव आंबेडकर साहेब तसेच विविध सामाजिक, राजकीय आणि आंबेडकरी चळवळीतील मान्यवर नेत्यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. मुसळधार पाऊस सुरू असतानाही मोर्चेकऱ्यांचा उत्साह आणि निर्धार कायम राहिला.भीम आर्मी महाराष्ट्रने या महामोर्चामध्ये सक्रिय सहभाग घेतला. या प्रसंगी भीम आर्मी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक कांबळे यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना अनुसूचित जातींच्या संविधानिक आरक्षणाशी कोणतीही छेडछाड सहन केली जाणार नाही, असा ठाम इशारा दिला. त्यांनी सर्व अनुसूचित जातींनी एकजुटीने संविधान, सामाजिक न्याय आणि समतेच्या संरक्षणासाठी लढा अधिक तीव्र करण्याचे आवाहन केले.आजचा महामोर्चा हा अनुसूचित जातींच्या ऐक्याचा आणि संविधान रक्षणाच्या निर्धाराचा ऐतिहासिक संदेश देणारा ठरला. भीम आर्मी महाराष्ट्र या लढ्यात शेवटपर्यंत संविधानिक मार्गाने संघर्ष करत राहील, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.


महामोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्या सर्व संघटना, संयोजक, स्वयंसेवक, कार्यकर्ते तसेच शिस्तबद्ध सहभाग नोंदविणाऱ्या सर्व नागरिकांचे भीम आर्मी महाराष्ट्रतर्फे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments