Type Here to Get Search Results !

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या लढ्याला यश; धर्मादाय आयुक्तांचा निकाल ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या बाजूने

 मुंबई : दि.20 जुलै 2026 पीपल्स एज्युकेशन सोसायटी `PES` चा प्रदीर्घ न्यायालयीन लढा अखेर यशस्वी झाला आहे. या खटल्यासंदर्भात महाराष्ट्र धर्मादाय आयुक्त यांनी ऐतिहासिक निकाल देत ॲड. प्रकाश आंबेडकर आणि ब्रजेंद्र के. चौबे यांच्या बाजूने कौल दिला आहे. या निकालानंतर आता दोघेही पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अधिकृत ट्रस्टी म्हणून काम पाहतील. धर्मादाय आयुक्तांच्या या निर्णयामुळे `PES` ला अखेर न्याय मिळाला असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या भविष्याबतचा वाद मिटला आहे, अशी चर्चा संपूर्ण राज्यात सुरू आहे.

ॲड. प्रकाश आंबेडकर हे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे ट्रस्टी होऊ नयेत यासाठी एस. पी. गायकवाड यांच्यासह अनेकांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले. त्यासाठी अनेक आघाड्या उभारून कायदेशीर लढाई लढवण्यात आली. मात्र, ही संपूर्ण लढाई अखेर न्यायालयीन आणि कायदेशीर प्रक्रियेतूनच पुढे गेली. एक प्रदीर्घ आणि गुंतागुंतीची कायदेशीर लढाई होती. अनेक अडथळे पार करून अखेर न्यायालयीन प्रक्रियेनंतर सत्याचा विजय झाला. धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या निकालात ॲड. प्रकाश आंबेडकर आणि ब्रजेंद्र के. चौबे यांची बाजू खरी ठरवत त्यांना `PES` चे अधिकृत ट्रस्टी म्हणून मान्यता दिली.या निकालामुळे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापनात पारदर्शकता येईल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक विचारांना नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



Post a Comment

0 Comments