नवी मुंबई, 20 जुलै 2026 : सिडकोच्या बहुप्रतिक्षित “माझे पसंतीचे सिडकोचे घर - माझा 1st चॉइस” गृहनिर्माण योजनेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेल्या 8,795 सदनिकांची संगणकीय सोडत आज पार पडली. ही सोडत सिडको भवन, सीबीडी बेलापूर येथे सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. अश्विन मुद्गल यांच्या हस्ते पारदर्शक पद्धतीने संपन्न झाली.डिसेंबर 2025 मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत तळोजा, कळंबोली, खारघर, उलवे आणि खारकोपर येथे EWS प्रवर्गातील 8,795 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या सदनिकांसाठी एकूण 10,832 अर्ज प्राप्त झाले होते.सोडतीवेळी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री. शान्तनु गोयल, डॉ. राजा दयानिधी, मुख्य दक्षता अधिकारी श्री. सुरेश मेंगडे, संचालक श्री. नरेंद्र भामरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित हो
ते.या प्रसंगी बोलताना श्री. अश्विन मुद्गल म्हणाले की, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना हक्काची घरे उपलब्ध करून देणे हे सिडकोचे प्रमुख ध्येय आहे. उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नामांकित कंपन्यांकडून तयार केलेला आराखडा यामुळे सिडकोची घरे गुणवत्तापूर्ण आहेत.सिडको प्रशासनाने स्पष्ट केले की, ही सोडत केवळ EWS प्रवर्गासाठी होती. इतर प्रवर्गातील सदनिकांची सोडत मा. उच्च न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत स्थगित ठेवण्यात आली आहे. सोडतीतील यशस्वी अर्जदारांची यादी www.cidcohomes.com या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्जदारांनी आपले नाव यादीत तपासून घ्यावे, असे आवाहन सिडकोने केले आहे.

Post a Comment
0 Comments