Type Here to Get Search Results !

"आम्ही जिवंत आहोत"चा संदेश देत पनवेलमध्ये NEET पेपर लीक आणि सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ निदर्शने



 पनवेल, रायगड : राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षा `NEET` मधील गैरव्यवहार, वारंवार होणारी प्रश्नपत्रिका फुटी आणि भ्रष्टाचाराविरोधात तसेच गेल्या 20 दिवसांपासून उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ पनवेलमधील संविधानप्रेमी नागरिकांनी शांततापूर्ण निदर्शने केली.

सदरआंदोलनात सरकारकडे 3 मुख्य मागण्या केल्या  NEET परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणून पेपर लीक थांबवावे आणि सोनम वांगचुक यांच्या मागण्यांना पाठिंबा - 18 जुलै रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथून त्यांना पोलिसांनी हटवून रुग्णालयात दाखल केल्याचा निषेध तसेच देशातील लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करणे.

या आंदोलनात पनवेलमधील विद्यार्थी, पालक, युवकांसह  अनेक संघटनांनी - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती  `MANS`AISF, संविधान प्रचारक, सत्यशोधक विद्यार्थी परिषद ,माहिती अधिकार महासंघ आणि इतर सामाजिक संघटनांनी भाग घेतला.

जनआंदोलनाच्या उल्का महाजन म्हणाल्या,“भूक, भीती, भ्रम, भेद, भीक आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून देशातील लोकशाही धोक्यात आणली जात आहे ” .उपस्थितांनी  पुढे ही संविधानिक मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केला. तसेच या विषयावर राष्ट्रपतींकडे निवेदन सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला.आंदोलनादरम्यान पोलिसांनी आवश्यक ते सहकार्य केले.




Post a Comment

0 Comments