बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातील बालवाडी प्रकल्पाच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत माननीय उपायुक्त (शिक्षण) यांच्याकडे भेटीसाठी विनंती करण्यात आली होती. त्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत दिनांक १७/०८/२०२६ रोजी, माननीय उपायुक्त (शिक्षण) यांची भेट झाली.
या भेटीदरम्यान बालवाडी प्रकल्पातील सेविका, शिक्षक मदतनीस यांच्या वेतनासह विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रत्येक मुद्द्याची गांभीर्याने दखल घेत माननीय उपायुक्त (शिक्षण) यांनी संबंधित विभागांना आवश्यक ती कार्यवाही करून योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देश दिले.
आजची ही बैठक केवळ चर्चा करण्यापुरती मर्यादित नसून, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातील बालवाडी प्रकल्पाच्या सेविका व शिक्षक मदतनीस यांच्या भविष्यासाठी सकारात्मक आणि महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
आजच्या बैठकीमुळे येणाऱ्या काळात सेविका शिक्षक मदतनीस यांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. याच उद्देशाने आजची बैठक घेण्यात आली होती, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
कामगारांच्या प्रश्नांसाठी संघर्ष सुरूच राहील!सेविका व शिक्षक मदतनीस यांच्या न्याय्य हक्कांसाठी सदैव प्र
यत्नशील!

Post a Comment
0 Comments