पनवेल दि. २० ऑगस्ट : हिंसा, द्वेष आणि सामाजिक असहिष्णुतेविरोधात जनजागृती करत मानवता, शांतता आणि समतेचा संदेश देण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा पनवेल यांच्या वतीने ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर — महात्मा ते महात्मा, निर्भय मॉर्निंग वॉक’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी ७.०० वाजता ठिकाण -डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते छत़पती शिवाजी महाराज पूतळा पर्यंत आयोजक केले .
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा पनवेल वतीने सदर कार्यक्रम चे आयोजित केले.समाजात मानवतेचा संवाद कायम राहावा, पुढील पिढ्यांना आनंदी, समृद्ध आणि एकात्म समाज मिळावा, तसेच हिंसेऐवजी शांततेचा मार्ग स्वीकारण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मानवतेच्या बाजूने आपला निर्धार व्यक्त केला.या उपक्रमाच्या माध्यमातून “हिंसेविरुद्ध, मानवतेच्या बाजूने” हा संदेश जनमानसात पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. महात्मा गांधी आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मानवतावादी विचारांचा संदर्भ देत सामाजिक परिवर्तनासाठी शांततामय मार्गाची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन शांतता, समता आणि मानवतेचा आवाज बुलंद केला, असे म्हणणे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पनवेल शाखेने केले आहे.

Post a Comment
0 Comments