Type Here to Get Search Results !

सेविका व शिक्षक मदतनीसांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी श्रमिक भारतीय युनियनचा लढा



मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) शिक्षण विभागातील सेविका तथा शिक्षक मदतनीसांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी श्रमिक भारतीय युनियनच्या माध्यमातून शनिवार, २६ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत सेविका व शिक्षक मदतनीसांच्या सेवा, वेतन आणि आर्थिक लाभांशी संबंधित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत वेळेवर वेतन, योग्य वेतनवाढ, बोनस व इतर आर्थिक लाभ, कामगारांना मिळणाऱ्या सवलती-सुविधा, सेवेशी संबंधित हक्क व संरक्षण तसेच दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या सेविका व शिक्षक मदतनीसांना न्याय मिळावा, या मागण्यांवर चर्चा झाली.

या प्रश्नांसाठी संविधानिक आणि कायदेशीर मार्गाने संघटितपणे पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. प्रशासनाशी चर्चा, कामगार आयुक्तांकडे पाठपुरावा, शासनाकडे मागणी तसेच आवश्यकतेनुसार न्यायालयीन मार्गाचा अवलंब करण्याबाबतही भूमिका मांडण्यात आली.

बैठकीला प्रमुख कामगार नेते रमेश मारुती जाधव, युनियनचे उपाध्यक्ष संजय हाटे, सेक्रेटरी भूषण कासारे, तसेच पूजा जोशी, स्वाती घोलप यांच्यासह मुंबईतील अनेक प्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सेविका व शिक्षक मदतनीसांच्या प्रलंबित प्रश्नांवर संघटितपणे लढा देत त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.

“लढा हक्काचा — विजय एकजुटीचा; संविधानाच्या मार्गाने न्यायासाठी संघर्ष!” असा संदेश यावेळी देण्यात आला.

Post a Comment

0 Comments