Type Here to Get Search Results !

दिवंगत भैयालाल भोतमांगे अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत, खैरलांजी हत्याकांडाला तब्बल २० वर्षे पूर्ण -द्रौपदीपुत्र दीपक धाकु गायकवाड

 


भाद्रपद कृ.३, शालिवाहन शके १९४८ अर्थात मंगळवार दि. २९ सप्टेंबर २०२६


खैरलांजी


गांजलेल्या माणसाची हाक आहे खैरलांजी

प्रेम, करुणा अन् दयेची राख आहे खैरलांजी


कापली गेली प्रियंका मारले रोशन-सुधीरा

मानवाच्या क्रूरतेची चाक आहे खैरलांजी


ही कशाची लोकशाही ही असे रे ठोकशाही

जन्म घेणाऱ्या पिढ्यांना धाक आहे खैरलांजी


माणसाने माणसाचा थांबवा हा नाच नंगा

भारताचे कापलेले नाक आहे खैरलांजी


नग्न अमुची संस्कृती अन् क्रूरता हा धर्म झाला

हा नवा संदेश आता टाकत आहे खैरलांजी.


कवी- गिरीश खारकर.



भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी येथे एका दलित कुटुंबातील सामूहिक हत्याकांडाने संपूर्ण देश ढवळून निघाला होता. भैयालाल भोतमांगे यांची पत्नी आणि तीन मुले अशा चौघांची हत्या करण्यात आली होती. मानवतेला काळिमा फासणारी ही घटना महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावरही एक काळा डाग ठरली होती. या घटनेला आज २० वर्षे पूर्ण होत आहेत. या नरसंहारातून बचावलेले भैयालाल भोतमांगे हे निधनानंतर अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.


खैरलांजी हत्याकांडाचे पडसाद महाराष्ट्रासह संपूर्ण देशात उमटले. ठिकठिकाणी आंदोलने झाली, जाळपोळीच्या घटनाही घडल्या. नागपूरच्या दीक्षाभूमीवर २००६ च्या २ ऑक्टोबरला बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेचे ५० वे वर्ष साजरे होणार होते आणि २९ सप्टेंबरला भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी या छोट्याशा गावात भैयालाल भोतमांगे या दलिताचे सारे कुटुंबच एका गटाने अमानुषपणे हत्या करून संपवून टाकले. भैयालालची पत्नी सुरेखा मेहनती होती आणि मुले प्रियंका, सुधीर आणि रोशन शिक्षण घेत होती व सन्मानाने हे कुटुंब जगत होते. सुरेखा समोर अन्याय झाला तर ती पोलिसांच्या समोर आरोपींविरुद्ध साक्षही देत होती. हे कुटुंब दलित असूनही गयावया न करता सन्मानाने जगते, कुणाच्या वळचणीला नाही. याचा राग गावातील दलितेतरांचा होताच. त्यातून सर्वाच्या रागाचा भडका उडाला आणि ही घटना घडली.


या घटनेनंतर एक-दीड महिना दलित हत्याकांड आणि अ‍ॅट्रॉसिटी, सुरेखाचे चरित्रहनन, बलात्कार वगैरे गोष्टींवरच चर्वितचर्वण सुरू होते. मात्र, दलित नेत्यांनी पोकळ भाषणे करण्याशिवाय काहीही केले नाही. तेव्हा सामान्य दलितांच्या भावनांचा उद्रेक केवळ राज्यातच नव्हे तर देशभर उडाला आणि देशभरातील राष्ट्रीय प्रसिद्धी माध्यमांचे लक्ष या घटनेकडे वेधले गेले. सरकारने भैयालाल भोतमांगे यांना मदत केली, संघटना आणि विविध पक्षांनी या मुद्द्यावर सोयीचे राजकारण केले. कालांतराने हा मुद्दा पडद्याआड गेला. तेरा वर्ष होत आली, भैय्यालाल न्याय मागतो आहे. सामान्य दलितांसाठी हे प्रकरण फक्त एका कुटुंबातील हत्याकांडापुरते मर्यादित नव्हते, समाजावर होत असलेल्या अत्याचाराचे ते प्रतीक मानले गेले व म्हणून त्याविरुद्ध झालेला उठाव हा सार्वत्रिक होता. आताही सामान्य दलित सुरेखा भोतमांगे आणि तिच्या मुलांच्या आठवणीत दरवर्षी स्मृतीदिन साजरा करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतात. आश्चर्य म्हणजे भीषण, बिभत्स, क्रूर कांड होऊनही त्यात अ‍ॅट्रोसिटी लावली गेली नाही आणि केवळ खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आजही अ‍ॅट्रोसिटी रद्द करण्याची मागणी केली जात आहे. कायद्याने दलित व आदिवासींना दिलेले हे संरक्षण आहे. त्यामुळे काही प्रमाणात वचक आहे. त्यामुळे तो रद्द करण्यास किंवा तो शिथिल करण्यास दलित संघटनांचा विरोध आहे.


मला न्याय हवा आहे. माझ्या कुटुंबीयांची निर्घृण हत्या करणाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे. असं म्हणत २०१७ रोजी निधन होण्याआधी भैयालाल भोतमांगे सातत्याने बोलत असत.


भैयालाल यांची खैरलांजी नंतरची स्थिती


खैरलांजी नंतर भैयालाल हे तीन खोल्यांच्या पक्क्या घरात राहत. सरकारने त्यांना भंडारा येथील म्हाडा कॉलनीत घर दिले आहे. तसेच त्यांना वसतिगृहात सुरक्षा रक्षकांची नोकरी देण्यात आली आहे. त्यातून त्यांना १५ हजार रुपये महिन्याला मिळायचा. भैयालाल यांनी त्यांचे शेत २० हजार रुपये प्रतिवर्ष या प्रमाणे भाडेपट्टीने दिले होते. त्यांच्या उत्पन्नाचा बराचसा पैसा सर्वोच्च न्यायालयातील खटल्यासाठी दिल्ली आणि मुंबईला जाण्यात खर्च होत होता.


खैरलांजीचे वास्तव


खैरलांजी गावातील लोकसंख्या ८०० च्या जवळपास आहे. यात केवळ पाच घरे आदिवासींची आणि दोन घर दलितांची आहेत. कुटुंबीयांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी २९ सप्टेंबरला खैरलांजीला जात असतो. गावात माझ्याशी कुणीही बोलत नाही. तेथे अजूनही माझ्या जीवाला धोका असल्याचे मला वाटते, असे भैयालाल २०१६ ला प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले.


तेव्हा आणि आता


दलितांवरील अत्याचार कुठेही कमी झालेले नाहीत. खैरलांजीपासून ते उनापर्यंत व आज मणिपूर, लडाख पर्यंत गेल्या एकोणिस वर्षांत दलित अत्याचारांच्या घटना सातत्याने घडत आहेत.


लोखंडी पलंग

भैयालाल भोतमांगे खैरलांजी येथे एका झोपडीत पत्नी सुरेखा (४५), मुलगा सुधीर (२१), रोशन (१९) आणि मुलगी प्रियंका (१७) यांच्यासोबत राहत होते. आता येथे दरवर्षी खैरलांजी नरसंहार दिनी (२९ सप्टेंबरला) दलित-बुद्धिस्ट संघटनांच्या वतीने मेणबत्ती लावून श्रद्धांजली अर्पण केली जाते. भोतमांगे यांची झोपडी नष्ट झाली असून तेथे केवळ एक लोखंडी खाट तेवढी आहे. अमानुष हत्याकांडाच्या स्मृती म्हणून ती खाट तेथे ठेवण्यात आली, असे भैयालाल त्यावेळी आवर्जून सांगायचे.


घटनाक्रम


नरसंहार

२९ सप्टेंबर २००६ ला खैरलांजी या गावातील एक जमावाने लाठ्या काठ्यांनी हल्ला केला आणि भोतमांगे कुटुंबातील चारजणांना ठार केले. त्यात सुरेखा आणि तिची मुले सुधीर, रोशन आणि प्रियांका यांची निर्घृण हत्या करण्यात आली.


चौकशी

हे प्रकरण स्थानिक पोलिसांकडून सीआयडीकडे आणि नंतर सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आले. चौकशी दरम्यान आरोपींची संख्या ५० वरून ११ वर आली.


खैरलांजी हत्याकांड

आजच्या दिवशी म्हणजेच २९ सप्टेंबर २००६ रोजी खैरलांजी हत्याकांड घडले हा दिवस भारतीय इतिहासातला सर्वात काळा दिवस. या खैरलांजी हत्याकांडाला आज २० वर्षे पूर्ण होत आहेत.


२० वर्षानंतर एक प्रश्न आजही अनुत्तरीत आहे, खैरलांजी हत्याकांडाला न्याय मिळाला का?


आज दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी खैरलांजी हत्याकांडाला २० वर्षे पूर्ण होतील, आणि कधीही बऱ्या न होणाऱ्या आमच्या काळजाच्या जखमा पुन्हा रक्ताळतील, या घटनेविरुद्ध कुठे शोक सभा होतील, कुठे श्रद्धांजली वाहिली जाईल, कुठे निदर्शने केली जातील, एखाद्या न्यूज चॅनेल वर विषय घेतला जाईल आणि काही निकाल लागण्यापूर्वीच आमची वेळ संपली म्हणून विषय बंद हि केला जाईल, पण या सर्व गोष्टीतून आम्हाला मात्र तीव्र वेदना नक्कीच होतील, आमच्या आया, बहिणी, बांधव, या बेगडी पुरोगामी महाराष्ट्रात सुरक्षित आहेत का? आज हि कित्येक गावात सर्रासपणे रोज खैरलांजी घडत आहे, कित्येक भोतमांगे आज वेगवेगळ्या नावाने या जातीयतेचे बळी पडत आहेत. आज पुन्हा एकदा Atrocities Act आणि सरकारच्या जातीयता निर्मूलनाच्या हेतूवर प्रश्न चिन्ह उभे राहत आहे, या निमित्ताने जाणून घेऊ खैरलांजी प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम. तत्पूर्वी अमानुष जातीय हत्याकांडात बळी पडलेल्या भोतमांगे कुटुंबातील सुरेखा, प्रियंका, सुधीर आणि रोशन यांना आणि न्याय न मिळताच न्याय मिळाल्याचा आविर्भावात राज्यकर्त्यांनी ठेवलेल्या २० जानेवारी २०१७ रोजी निधन झालेल्या भैयालाल भोतमांगे यांना भावपूर्ण आदरांजली.


महाराष्ट्रातल्या भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात महाराष्ट्रातील समाज जीवन ढवळून टाकणारे खैरलांजी हत्याकांड २९ सप्टेंबर २००६ ला घडले. या हत्याकांडाचे पडसाद विधिमंडळापासून संसदेपर्यंत उमटले. आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनेची दखल घेण्यात आली. घटनेनंतर राज्यभर आंदोलनांचे लोण उसळले. घटनेनंतर सुमारे सात महिन्यांनी दाखल झालेल्या आणि पंधरा महिने चाललेल्या खटल्याचा निकाल १५ सप्टेंबर २००८ रोजी लागला. न्यायालयाने आठ आरोपींना दोषी ठरवले.


हत्याकांडाची पार्श्वभूमी थोडक्यात अशा प्रकारे होती, भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील खैरलांजी गावात भोतमांगे कुटुंब स्वाभिमानाने जगत होते, छोट्याशा शेतीच्या तुकड्यामध्ये शेती करून आपला उदरनिर्वाह करत होते, रोशन हा डोळ्याने अंध होता, प्रियंका शाळा शिकत होती, टापटीप आणि सुशिक्षित महाराची पोर जाता येता गावातल्या जात्यंध डोळ्यांना सलत होती, भोतमांगेच्या शेतामधून गावकऱ्यांसाठी रस्ता देण्यावरून अधून मधून खुसपूस होतच होती.


धुसाळा गावचा पोलीस पाटील सिद्धार्थ गजभिये भोतमांगे कुटुंबियांच्या ओळखीचा होता, त्याचे भोतमांगे कुटुंबियांकडे अधून मधून येणे जाणे होते, दुसऱ्या गावातील पोलीस पाटील या महारांच्या घरी येतोय, गावगुंड कसे आणि किती सहन करणार, त्यामुळे भोतमांगे कुटुंबीय गावगुंडाच्या नजरेत जास्तच सलत होते, गावातील अशिक्षित आणि बुरसटलेल्या विचारांना त्यागून भोतमांगे कुटुंबीय बाबासाहेबांच्या विचारावर चालत होते, सावित्रीची लेक बनून शिक्षणाचा ध्यास घेत होते, हेच गावगुंडांच्या विखारी नजरेस खुपत होते. भोतमांगे कुटुंबाविरुद्ध आपला राग व्यक्त करण्यास फक्त एक कारण हवे होते आणि ते कारण एके दिवशी घडलेच.


खैरलांजी गावचा सकरू बिंजेवार हा धुसाळा गावचा पोलीस पाटील सिद्धार्थ गजभिये याच्या शेतामध्ये काम करीत असे. त्याच्या मजुरीचे २५० रुपये सिद्धार्थने न दिल्यामुळे दोघांमध्ये भांडण झाले आणि त्यात सकरूला मारहाण करण्यात आली. त्याचा बदला घेण्यासाठी सप्टेंबरला सकरूचा मुलगा गोपाल, शिवचरण मंडलेकर, कन्हैया मंडलेकर आणि जगदीश मंडलेकर यांनी सिद्धार्थ गजभियेचा पाठलाग करून त्याला मारहाण केली. सिद्धार्थच्या तक्रारीवरून आंधळगाव पोलिसांनी १६ सप्टेंबरला गुन्हा दाखल करून १२ जणांना अटक केली. हा गुन्हा अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार न होता नागरी हक्क संरक्षण कायद्यानुसार दाखल झाला होता.


तुम्ही जामिनावर सुटले असला तरी सिद्धार्थ गजभियेची माणसे शस्त्र घेऊन तुमच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत, तेव्हा सावध राहा, असे दिलीप ढेंगे याने भास्कर कढव याला मोबाईलवर सांगितले. हे ऐकून चिडलेल्या आरोपींनी सिद्धार्थ आणि त्याचा भाऊ राजन यांचा शोध घेतला परंतु, ते दोघे सापडले नाहीत. त्यामुळे बदला घेण्यासाठी हे आरोपी भोतमांगे यांच्या घरी गेले.


सिद्धार्थ गजभियेच्या बाजूने साक्ष दिल्याचा बदला घेण्यासाठी आरोपींनी भोतमांगे कुटुंबातील सुरेखा (३८), प्रियंका (१८), सुधीर (२२) आणि अंध रोशन (१८) या चौघांची जातीवाचक शिवीगाळ करून काठ्या आणि सायकलच्या चेनने मारहाण करून हत्या केली. महिलांचा विनयभंग करून त्यांचे निर्वस्त्र मृतदेह बैलगाडीत टाकून साडेतीन किलोमीटर अंतरावरील कालव्यात फेकून देण्यात आले. ही घटना घडताना या अमानुष हल्ल्यात एकमेव व्यक्ती वाचले भैयालाल भोतमांगे. भैय्यालाल वाचल्यामुळे सदर हत्याकांड उघडकीस आले, अन्यथा दररोज अशा प्रकारच्या घडणाऱ्या घटनांचा सुगावा देखील लागत नाही, कारण प्रत्येक वेळी भैयालाल वाचत नाही.


या घटनेबाबत कळूनही सिद्धार्थने या कुटुंबाला काही मदत केली नाही. घटनेपूर्वी सुरेखाने तिचा भाचा राष्ट्रपाल नारनवरे याला फोन करून, आपण साक्ष दिलेली असल्याने काही घडू शकते, अशी भीती व्यक्त केली होती. आपला आंधळगाव पोलिसांवर विश्वास नसल्याचे तिने सांगितले. त्यावर, तू वरठीला येऊन जा, असे राष्ट्रपालने तिला सांगितले होते. मात्र, सुरेखा तिकडे गेली नाही आणि हल्ल्याला बळी पडली. घटनेच्या दुसऱ्या दिवशी प्रियंकाचे प्रेत वडगाव शिवारात सापडले. तिसऱ्या दिवशी, म्हणजे १ ऑक्टोबरला सुरेखा, रोशन व सुधीर यांचे मृतदेह कालव्यात वेगवेगळ्या ठिकाणी सापडले. पोलिसांनी याप्रकरणी आधी २८ जणांना अटक केली. नंतर इतरांच्या अटकेमुळे ही संख्या ४४ वर गेली. आरोपींकडून १२ काठ्या आणि सायकलच्या ८ चेन जप्त करण्यात आल्या.


पोलिसांनी या प्रकरणी १ ऑक्टोबर २००६ ला गुन्हा दाखल करून २७ डिसेंबरला भंडारा येथील सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सी.बी.आय. ने या प्रकरणी ४७ जणांना आरोपी केले होते परंतु त्यापैकी ३६ जणांची न्यायालयाने सुटका केली. शेवटी ११ आरोपींवर खटला चालला. ४ प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांसह एकूण ३६ जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. यापैकी महादेव झंझाळ हा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फितूर झाला. त्यासाठी याला ३ महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.


भंडाऱ्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. दास यांनी या प्रकरणाची सुनावणी करून १५ सप्टेंबर २००८ ला निकाल जाहीर केला. खून, पुरावा नष्ट करणे, बेकायदेशीररीत्या मंडळी जमवणे व दंगा करणे, या आरोपांखाली त्यांनी आठ आरोपींना दोषी ठरवले. दोघांची पुराव्याअभावी तर, एकाला संशयाचा फायदा देऊन अशा तीन आरोपींची न्यायालयाने सुटका केली होती. या हत्याकांड प्रकरणी सुरवातीला ४७ जणांना अटक करण्यात आले होते. मात्र, त्यांतील ३६ जणांची सीबीआयने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर उरलेल्या अकरा जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले. या हत्याकांड खटल्याचा निकाल भंडारा येथील सत्र न्यायालयाचे न्या एस. एस. दास यांनी २४ सप्टेंबर २००८ रोजी दिलेला आहे.


त्यातील आरोपीच्या शिक्षेला आव्हान देण्यात आले होते. सरकारच्या वतीने आरोपींच्या शिक्षेत वाढ करण्यात यावी आणि आरोपीविरोधात अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये खटला मान्य करण्यात यावा म्हणून केंद्रीय गुप्तचर खात्याच्यावतीने दोन अर्ज करण्यात आले होते. त्यावर न्या. ए. पी. लवांदे आणि न्या. आर. सी. चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे.


भोतमांगे कुटुंबीयांच्या हत्याकांडातील प्रमुख साक्षीदार म्हणून भोतमांगे यांचा शेजारी मुकेश पुसाम याला सरकारी पक्षाने सादर केले होते. घटनेच्या वेळी पुसाम हा घरात होता. तेव्हा त्याला जगदीश मंडलेकर याचा जोराने शिवीगाळीचा आवाज आला त्यामुळे पुसाम घराबाहेर येऊन उभा राहिला. तेव्हा जगदीश मंडलेकर याने शिवीगाळ करून भोतमांगे कुटुंबीयांना जीवे मारण्यासाठी इतरांना प्रोत्साहित करताना पाहिले. जमावाचा आवाज ऐकून सुरेखा भोतमांगे घराबाहेर आली होती. तिने गोठ्याला आग लावली तसेच नंतर जमावाने तिला पकडून लाठ्या आणि सायकल चेनने मारताना पुसामने बघितले होते. पुसामने त्या सातही आरोपींची नावे न्यायालयात साक्षीतून दिलेली होती. तसेच त्याने दिलेली नावे ही न्यायदंडाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बयाणातही आहेत. त्यामुळे त्याची साक्ष ही प्रमुख मानली गेली.


पुसामच्या साक्षीनुसार, आरोपींनी प्रथम सुरेखाला नालीत टाकून लाथा, काठी आणि सायकलचेनने मारले. नंतर तिचा मृतदेह रस्त्यावर आणून टाकला. नंतर त्यांनी सुधीरला घेरून मारले आणि त्याचा मृतदेहही तिच्या शेजारी आणून ठेवला. त्यानंतर रामदास खंडातेच्या गोठ्यात लपून बसलेल्या रोशनला मारून तिथे आणले. तर प्रियांकालाही अशाप्रकारे मारून तिथे आणल्याचे पुसामने साक्षीत नमूद केले आहे. दरम्यान, रोशन हा त्यावेळी जिवंत होता. त्याने आपला जीव वाचविण्यासाठी आरोपींना याचना केली होती; मात्र भोतमांगे यांना मारल्याची बाब कुणाला सांगितली तर अशीच दशा केली जाईल; म्हणून जगदीश मंडलेकरने धमकावले होते. त्यामुळे घाबरून पुसाम आपल्या घरात गेला. तेथून त्याने आरोपींना भोतमांगे कुटुंबातील चौघांना बैलगाडीतून नेताना बघितले होते. त्यावेळी कोण बैलगाडी हाकत होता; तसेच त्यामागे कोण जात होते, त्यांची नावेदेखील पुसामने साक्षीतून दिलेली आहेत.


या प्रकरणात पोलिसांनंतर सीबीआयकडे तपास देण्यात आला होता.

मुख्य घटनेचा पंचनामा करण्यात आलेला नाही,

सुरेखा भोतमांगे हिचे शव कोठे सापडले याचा पंचनामा केलेला नसणे,

घटनास्थळाचे वर्णन दोषपूर्ण आहे, असेही बचाव पक्षाने न्यायालयात सांगितले.

मुकेश पुसाम घटनेच्या दिवशी गावात नव्हता, असा युक्तिवादही करण्यात आला.

ज्या बैलगाडीतून प्रेत नेण्यात आले त्याच्या मालकाचा जबाब नोंदवण्यात आलेला नाही. शिवाय,

हत्याकांडात वापरण्यात आलेली हत्यारे न्यायालयात दाखवण्यात आलेली नाहीत,

असेही बचाव पक्षाने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले होते.


फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या ६ जणांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जन्मठेप ऐकवली. अन्य दोघांच्या जन्मठेपेच्या शिक्षेवर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. हायकोर्टाच्या सभागृहात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने हा निकाल जाहीर करताना न्या. ए. पी. लवांदे आणि न्या. रवींद्र चव्हाण यांनी सकरू बिंजेवार, शत्रुघ्न धांडे, जगदीश मंडलेकर, प्रभाकर मंडलेकर, विश्वनाथ धांडे, रामू धांडे यांची शिक्षा कमी केली. तर गोपाल बिंजेवार आणि शिशुपाल धांडे यांच्या जन्मठेपेच्या शिक्षेवर शिक्का बसवला.


खैरलांजी हत्याकांड जातीयवादातून घडले आहे. त्यामुळे सर्व आरोपींना अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत शिक्षा करण्यात यावी, असा अर्ज सीबीआयने दाखल केला होता. २९ सप्टेंबर २००६ रोजी संध्याकाळी गावकऱ्यांनी अचानक भैय्यालाल भोतमांगे यांच्या घरावर हल्ला केला होता. तेव्हा आरोपींनी जातीयवाचक शिवीगाळ करून घरातील एकेका सदस्याला पकडून ठार मारले होते. भैय्यालाल भोतमांगे यांनी केलेल्या तक्रारीत आरोपींच्या जातीचा उल्लेख केला असला तरीही सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांमध्ये आरोपींच्या जातीचा उल्लेख तक्रारीत असणे अनिवार्य नसल्याचे नमूद केले आहे. खटल्यादरम्यान एका साक्षदाराच्या साक्षीत पाच आरोपी हे कलार जातीचे असल्याचा उल्लेख आलेला आहे. सदर बाब सत्र न्यायालयाने ग्राह्य धरली होती. तरीही सर्व आरोपींची अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत निर्दोष मुक्तता करून सत्र न्यायालयाने ज्युडिशियल एरर (न्यायिक चूक) केली असल्याचा युक्तिवाद सीबीआयचे वकील एजाज खान यांनी उच्च न्यायालयात केला होता. तसेच सर्व आरोपींना अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत शिक्षा करावी, अशी विनंती सीबीआयने केली होती. तर बचाव पक्षाने गावात जातीयवाद नसल्याचा दावा केला होता. तर सत्र न्यायालयाने अ‍ॅट्रोसिटीतून मुक्त करण्याच्या निर्णयाचा आदर बचाव पक्षाने व्यक्त केला होता. मात्र, उच्च न्यायालयाने अ‍ॅट्रोसिटीच्या गुन्ह्याबाबत सत्र न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवला आहे. आरोपींना प्रियंका व सुरेखा यांच्या विनयभंगाच्या आरोपातून मुक्त करून सत्र न्यायालयाने गुन्ह्याची तीव्रता कमी केली, असा युक्तिवाद करीत सीबीआयने या गुन्ह्याखालीही सर्व आरोपींना शिक्षा करावी, असा अर्ज केला होता. मात्र, सीबीआयचा हा अर्ज देखील न्यायालयाने निकालात काढला आहे.


हत्याकांडातील सहा आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना २५ वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुनावली, १४ जुलै रोजी देण्यात आलेल्या या निकालाला सीबीआय लवकरच सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार होती. हत्याकांडातील आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा देण्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला भैय्यालाल भोतमांगे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून प्रकरणी सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी विनंती करणारी विशेष अनुमती याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली.


नागपूरच्या कारागृहात शिक्षा भोगत असलेला जगदीश मंडलेकर १३ फेब्रुवारी २०१२ ला पॅरोलवर एका महिन्यासाठी गावी खैरलांजी येथे आला. दरम्यान, दम्याचा त्रास वाढल्याने त्याच्या पॅरोलचा कालावधी एका महिन्याने वाढविण्यात आला. तो १३ एप्रिलला कारागृहात परत जाणार होता. मात्र प्रकृती बिघडल्यामुळे त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.


जर असेच एक एक आरोपी स्वतः होऊन मरण पावू लागले तर न्यायाचे काय? आम्हाला न्याय कसा मिळणार जेव्हा या लोकांना फाशीवर लटकावले जाणार नाही तो पर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही, सदर प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा दिली तरच कुठे यांचे जात्यंध हात पुन्हा असे कृत्य करायला धजावणार नाहीत,

या प्रकरणात ना सुरेखा आणि प्रियांका या भोतमांगे मायलेकींच्या विटंबनेचा गुन्हा दाखल झाला,

ना दलित अत्याचारविरोधी कायद्याखाली गुन्हा नोंदवला गेला.

कोणत्याही सर्वसामान्य खुनांप्रमाणेच इथल्या संवेदनाहीन चौकटीने हा दावा चालवला आणि निकाल दिला.

हत्याकांडातील प्रमुख आरोपींपर्यंत कायद्याचे हातच काय, बोटंसुद्धा पोहोचू शकली नाहीत.

ज्यांना सजा सुनावली गेली तीही गुन्ह्याच्या स्वरूपाच्या तुलनेने नगण्य म्हणावी अशी होती.

कायद्यातील तरतुदी, त्याला आवश्यक असणारे पुरावे, किचकट कार्यपद्धती आणि कलमांचे ज्याच्यात्याच्या सोयीनुसार निघणारे अर्थ यांच्या जोडीला सत्ताधाऱ्यांच्या मनातले छुपे अजेंडेही नंतर स्पष्ट झाले.


महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी गावाला तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या कार्यकाळात सन २००८-२००९ च्या दरम्यान महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेअंतर्गत तंटामुक्त गाव पुरस्कार घोषित करण्यात आला होता.


निर्णयाची पार्श्वभूमी: २९ सप्टेंबर २००६ रोजी खैरलांजीत अत्यंत अमानुष आणि क्रूर हत्याकांड घडले होते. या भीषण घटनेनंतर अवघ्या काही वर्षांतच गावाला तंटामुक्त घोषित केल्यामुळे राज्य सरकारवर आणि गृहविभागावर चौफेर टीका झाली होती.

पुरस्कार मागे घेणे: चौफेर स्तरावरून झालेल्या तीव्र विरोधामुळे आणि जनक्षोभामुळे अखेर शासनाला खैरलांजी गावाला जाहीर केलेला हा तंटामुक्त गावाचा पुरस्कार मागे घ्यावा लागला होता.


जणू काहीच झालं नसल्याप्रमाणे निर्ढावलेपणाने खैरलांजीला तंटामुक्त गावाचा पुरस्कार घोषित केला गेला. चहूबाजूंनी टीका झाल्याने तो मागे घेतला गेला तरी सरकारची मानसिकता उघड झालीच.


राज्य शासन उच्च न्यायालयात आपली बाजू मांडण्यात अपयशी ठरल्यानेच आरोपींची फाशीची शिक्षा रद्द होऊन त्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली गेलेली आहे. पुन्हा एकदा अनुसूचित जाती जमाती कायदा सक्षम करण्याची आणि जातीयता गाडण्यासाठी कार्यक्षम कार्यप्रणालीची उणीव भासते.


खैरलांजी प्रकरणात न्याय मिळाला असता पण


खैरलांजी प्रकरणाला आज एकोणिस वर्षे पूर्ण झालीत. अत्यंत क्रूर हत्याकांड झाले अख्खे भोतमांगे कुटुंब भैय्यालाल भोतमांगे सोडून उद्ध्वस्त झाले. संपूर्ण देशातच नव्हे तर जगात या प्रकरणामुळे नाचक्की झाली. भोतमांगे कुटुंबियांचा लढा हा ब्राह्मणवादाने पोखरलेल्या प्रस्थापित लोकांशी होता. पण गावगुंड आणि राष्ट्रवादीच्या आमदाराचा वरदहस्त असणाऱ्या गुंडांनी भोतमांगे कुटुंबियांचा काटा काढला. या प्रकरणामुळे गटातटामध्ये विखुरलेला रिपब्लिकन समाज एकत्र आला. रिपब्लिकन नेत्यांना नागपुरात बंदी घालण्यात आली. त्याचीही तमा न बाळगता बाळासाहेब आंबेडकर वेषांतर करून अगोदरच नागपुरात दाखल झाले तर रामदास आठवले यांना विमानतळावर अटक करण्यात आली. तरीही बाळासाहेब, जोगेंद्र कवाडे, गवई सर्व रिपब्लिकन नेते रस्त्यावर उतरले, संपूर्ण समाज रस्त्यावर उतरला नेत्यासह अनेकांना अटक झाली डॉ. मिलिंद माने सारख्या कार्यकर्त्यांना अटक केली आणि स्थानबद्ध केले.


नंतर हे प्रकरण न्यायालयात गेल असताना तिथून खरी सुरुवात झाली. अॅड. संजय पाटील व इतर मंडळीनी शासनाने बौद्ध समाजातील अतिशय हुशार नावाजलेले अॅड. वाहवणे यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी म्हणून मागणी केली त्यावेळचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मान्य करून नियुक्तीपत्र पण दिले पण ऐनवेळी अॅड. उज्वल निकम सारख्या नावाजलेल्या सरकारी वकिलास हेतूपुरस्कर नियुक्ती देण्यात आली.


नंतर जातीयवादी विलासराव देशमुख, आर.आर.पाटील सरकारने ही केस जाणीवपूर्वक कमकुवत करण्याचा प्रयत्न केला.


भैयालाल भोतमांगे ही जातीयवाद्याच्या आमिषाला बळी पडले. ज्यादिवशी महत्वाची साक्ष होती त्या दिवशी जाणकार मंडळी भैय्यालाल भोतमांगे ला कुठेही न जाण्याचा सल्ला देत होते. तर त्या दिवशी हेतुपुरस्कर भैय्यालाल ला सोनिया गांधी च्या भेटीचे कारण सांगून दिल्लीला नेण्यात आले. जिथे अॅड. उज्वल निकम थांबले होते तिथेच त्यांना ठेवण्यात आले. जशी उलटतपासणी अॅड. उज्वल निकम कडून व्हायला पाहिजे होती तशी झाली नाही.


खैरलांजी प्रकरणी न्याय का नाही अशाप्रकारच्या अनेक पोस्ट पहावयास मिळत आहेत पण सत्य आणि तथ्य काय आहे हे कोणी सांगताना दिसत नाही. न्याय पूर्णतः न मिळण्याची काही कारणे खालीलप्रमाणे


१) विलासराव देशमुख सरकारने आपली संपूर्ण यंत्रणा विशिष्ट समाजाच्या लोकांना वाचविण्यासाठी आणि राष्ट्रवादीच्या आमदाराचे आरोपी नातलग असल्यामुळे पुरावे आणि सरकारी यंत्रणा त्या दृष्टीने कार्यान्वित ठेवली जरी यंत्रणेचे मुख्य लोक बौद्ध होते प

Post a Comment

0 Comments