भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी नेते मोहनदास करमचंद गांधी यांचा पौरबंदर गुजरात येथे जन्म.
भारतीय हिंदु संस्कृतीतील वर्णभेद कायम राहुन समाजात मैत्री तयार व्हावी व त्यासाठी कायम मुस्लिमांना झुकत माप देत अस्पृश्यांना सतत डावलणार्या राजकारणाचा नकळत पाया रचित असतानाच ब्रिटिशांचा अमल संपृष्टात यावा यासाठी जनमत तयार करणारे मोहनदास करमचंद गांधी यांच्या जयंती निमित्त त्यांच्या ध्येयवादी स्मृतीस विनम्र अभिवादन.
गांधी – आंबेडकर संवादाच्या वाटा
करता, मुसलमानांतील कुप्रथांविषयी बोलत नाही, त्यामुळे इथल्या हिंदू-ओबीसी समाजाच्या आकांक्षांना न्याय देत नाही अशा प्रकारचा कांगावा जे करतात त्यांना गांधी आणि आंबेडकर दोघांच्याही हिंदू धर्माविषयीच्या या भूमिकेचे स्मरण करून देणे गरजेचे आहे व इथे गांधी आणि आंबेडकर यांचे एकत्रित वाचनही आवश्यक आहे. गांधींच्या दृष्टीनुसार जर हिंदू धर्म आपले उन्नत रूप प्रकट करणार नसेल तर आंबेडकरांच्या विचारानुसार त्याचा त्याग करून अधिक विवेकशील, न्याय्य धर्माचा स्वीकार अपरिहार्यच ठरणार. हिंदू धर्माची पाठराखण म्हणजे त्यातील कुप्रथांचे, अंधश्रद्धेचे आणि ब्राह्मणी व्यवस्थेचे समर्थन नव्हे किंवा हिंदू धर्मात सुधारणेला काहीच वाव नाही, तो मुळातच महान आहे अशी भलावण करणे नव्हे. हिंदू धर्माविषयी प्रेम असणाऱ्यांनी हिंदू धर्म अधिकाधिक उन्नत बनविण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यातील कुप्रथांचे आणि ब्राह्मण्याचे समर्थन करणाऱ्यांना हिंदू विरोधी मानणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्यांना हिंदू धर्मात राहायचे आहे व त्याला अधिक उन्नत बनवायचे आहे त्यांचा तो अधिकार मान्य करणे हे आंबेडकरी विचाराचे पाईक असणाऱ्यांसाठी गरजेचे आहे. हिंदू धर्मसुधारणेची भूमिका घेणारा प्रत्येकजण हा आपला छुपा किंवा उघड शत्रूच आहे असे मानणे म्हणजे भारतीय समाजातील बहुसंख्याकांच्या धर्मात सुधारणा होण्याची शक्यता नाकारणे ठरेल. सारा भारत बुद्धमय करेन याचा अर्थ बुद्ध धम्माच्या मूल्यांचा अंगीकार की केवळ कागदोपत्री धर्मांतर याचाही गंभीरपणे विचार व्हायला हवा.
गांधी-आंबेडकर परस्पर पूरकतेचा आग्रह धरताना परिवर्तनाच्या प्रक्रियेत प्रस्थापिताच्या भूमिकेचाही नव्याने विचार करायला हवा. सामाजिक परिवर्तनाची निकड ही फक्त व्यवस्थेचे बळी ठरलेल्या शोषितांनाच असते, व्यवस्थेचा फायदा मिळालेली प्रत्येक व्यक्ती ही व्यवस्थेची छुपी समर्थकच असते या भूमिकेचा पुनर्विचार व्हायला हवा. आपल्याला मिळणारा व्यवस्थेचा लाभ हा शोषणाचा परिणाम आहे आणि जरी हा लाभ तात्कालिक सुख देत असला तरी त्यात आपण आपले माणूसपण गमावत आहोत याची जाणीव माणसाला आपले परंपरागत लाभ सोडून द्यायला तयार करू शकते ही गांधीवादी धारणा आणि अनुभूती आहे. मात्र प्रस्थापिताच्या नेणिवेत केवळ छुपे ब्राहमण्य किंवा व्यवस्था समर्थनच असते असे गृहीत धरून त्याच्या प्रत्येक कृतीकडे संशयाने बघणे हे एकूण समतेच्या प्रस्थापनेसाठी मारक ठरते याची जाण गांधी-आंबेडकरांना एकत्र आणताना ठेवायला हवी. गांधी हे जातीव्यवस्थेचे लाभार्थी होते तर आंबेडकर हे जातीव्यवस्थेचे बळी होते. आंबेडकर व्यवस्थेला बाहेरून प्रश्न विचारत होते, गांधी व्यवस्थेला आतून हादरे देऊ पहात होते. आपापल्या सामाजिक स्थानानुसार संघर्षाचे आयाम बदलतात व बदलणार याचे भान ठेवले तरच या दोन्ही विचार परंपरा एकत्र आणणे उपकारक ठरेल. गांधींनी सुचविलेले मार्ग व्यवस्थेचे बळी ठरलेल्यांना स्वीकारायला लावणे त्यांना स्वतःलाच अभिप्रेत नव्हते, आता तसा आग्रह धरणे हे गांधी आणि विषमता निर्मूलन दोन्हीसाठी अन्यायकारक ठरेल याची आठवण येथे गरजेची आहे. गांधी आणि आंबेडकर यांच्या विचारांचे वाचन त्यांच्या काळाच्या संदर्भात आणि इतिहासाने त्यांना ज्या सामाजिक स्थानावर बद्ध केले होते त्या स्थानाच्या संदर्भात केले तर समताधिष्टीत समाजाच्या निर्मितीसाठी त्यांच्या भूमिका पूरक ठरू शकतात.
ता.क.: गांधी – आंबेडकर संवादाच्या वाटा - चित्रा रेडकर यांचा ३१ मे २०१९ प्रसिध्द लेख साभार.
संदर्भ:
१ Zelliot, Elenor. 1972 Gandhi and Ambedkar: A Study in Leadership in J Michale Mahar. The Untouchables in Contmporary Intdia. Tuscon: University of Arizona.
२ दहिवले, एस. एम. १९७९ गांधी-आंबेडकर वाद: अस्पृश्यता-निर्मूलनविषयक भूमिकांचे मूल्यमापन समाज प्रबोधन पत्रिका वर्ष १६ अंक ३० मे-जून १९७२ पृ. १७५-१९७
३ Omvedt, Gail. 1994 Dalits and Democratic Revolution: Dr Ambedkar and Dalit Movement in Colonial India. New Delhi:
४ परदेशी, प्रतिमा. १९९६ डॉ. आंबेडकर आणि स्त्री-मुक्ती. स्त्री अभ्यास केंद्र, पुणे विद्यापीठ, पुणे.
५ सरदार, गं. बा. १९८७ गांधी आणि आंबेडकर. सुगावा प्रकाशन, पुणे.
६ सुमंत, यशवंत. १९९५ गांधी-आंबेडकर: कृतकसंघर्ष संपविण्याच्या दिशा समाज प्रबोधन पत्रिका क्र. १३०. जाने-मार्च १९९५.
७ पळशीकर, सुहास. १९९५ गांधी आणि आंबेडकर यांची चर्चाविश्वे: शत्रुभावी की मित्रभावी समाज प्रबोधन पत्रिका क्र. १३०. जाने-मार्च १९९५. डॉ. चैत्रा रेडकर श्री. ना.दा.ठा. महिला विद्यापीठ, मुंबई येथे राज्यशास्त्राच्या सहयोगी प्राध्यापिका आहेत.
लेखन, प्रसारक,
द्रौपदीपुत्र दीपक धाकु गायकवाड
संविधान साक्षरता अभियान
दक्ष मुंबईकर समिती DMS

Post a Comment
0 Comments