लालबहादूर शास्त्री यांचा संक्षिप्त ईतिहास
लालबहादूर शास्त्री भारताचे द्वितीय पंतप्रधान होते. पंडित नेहरू यांच्या मृत्यूनंतर लालबहादूर शास्त्री यांना ९ जून १९६४ ला पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले. जरीही लाल बहादुर शास्त्री यांचे स्थान द्वितीय होते तरी त्यांचे शासन कार्य अद्वितीय होते. अश्या या महान, कर्तुत्ववान आणि शांत स्वभावाच्या नेत्याला १९६६ मध्ये भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न देण्यात आला.
भारताचे प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांचा जन्म २ ऑक्टोंबर १९०४ ला उत्तर प्रदेश मधील मुगलसराय मध्ये झाला आहे. लालबहादूर शास्त्री यांचे वास्तविक नाव लालबहादूर श्रीवास्तव होते आणि त्यांच्या वडिलांचे नाव मुंशी शारदाप्रसाद श्रीवास्तव होते, त्यांचे वडील प्राथमिक शाळेत एक शिक्षक होते. शास्त्रींच्या आईचे नाव रामदुलारी होते. शास्त्री १८ महिन्याचे असताना त्यांचे वडीलांचे निधन झाले. ज्यामुळे त्यांची आई त्यांना सोबत घेऊन आपले वडील हजारीलाल यांच्या घरी मिर्झापूर येथे येऊन गेली.
लाल बहादुर शास्त्री यांचे प्राथमिक शिक्षण मिर्जापुर मध्ये झाले. या नंतरचे शिक्षण त्यांनी हरिश्चंद्र हायस्कूल आणि काशी विद्यापीठातून केले. त्यांनी काशी विद्यापीठातून संस्कृत भाषेत ग्रॅज्युएशन पूर्ण करून शास्त्री ही उपाधी प्राप्त केली. व नंतर त्यांनी जन्मापासून सोबत असलेले जाति सूचक आडनाव श्रीवास्तव काढून शास्त्री धारण केले.
१९२८ मध्ये लालबहादूर शास्त्री यांचा विवाह मिर्झापूर मधील गणेश प्रसाद यांची मुलगी ललिता देवीशी झाला. ललिता व शास्त्री यांचे ६ अपत्य झाले. ज्यात २ मुली आणि ४ मुले आहेत.
लाल बहादूर शास्त्री चे भारतीय स्वतंत्र युद्धातील कार्य
भारतीय स्वातंत्र्ययुद्धात शास्त्रींनी मरो नही मारो ची घोषणा दिली. ज्याने संपूर्ण देशात स्वातंत्र्याची ज्वाला तीव्र केली. शास्त्री महात्मा गांधीच्या विचारांनी प्रेरित एक गांधीवादी नेता होते. त्यांनी सर्व आंदोलनात सक्रिय पद्धतीने पुढाकार घेतला. त्यांनी १९२१ मधील असहयोग आंदोलन, १९३० मध्ये दांडी यात्रा व १९४२ मधील भारत छोडो आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली.
द्वितीय विश्व युद्धा दरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौज चे गठण करून दिल्ली चलो चा नारा दिला. याच दरम्यान गांधीजींच्या भारत छोड़ो आंदोलनाने तीव्रता धरली. लाल बहादूर शास्त्रीं यांनी भारतीयांना जागृत करण्यासाठी ८ ऑगस्ट १९४२ ला करो या मरो चा नारा दिला. परंतु ९ ऑगस्ट १९४२ ला त्यांनी आपला नारा बदलून मरो नही मारो ची घोषणा केली. या आंदोलनादरम्यान लाल बहादूर शास्त्रीना १९ ऑगस्ट १९४२ ला अटक करण्यात आली.
लाल बहादूर शास्त्री चे राजनैतिक कार्य
भारताच्या स्वातंत्र्यानंतर लालबहादूर शास्त्री यांना उत्तर प्रदेशच्या संसद चे सचिव बनवण्यात आले. १९४७ मध्येच त्यांना पोलिस आणि वाहतूक परिवहन मत्रीही बनवण्यात आले. त्यांनी पहिल्यांदा बस मध्ये महिला कंडक्टर ची नियुक्ती केली होती.
१९६४ मध्ये त्यांना भारताचे प्रधानमंत्री म्हणून निवडण्यात आले. त्यांनी दूध उत्पादनात वाढ करण्यासाठी श्वेत क्रांती ला प्रोत्साहन दिले. भारतात खाद्यपदार्थ वाढवण्यासाठी हरित क्रांतीला ही प्रोत्साहन दिले. त्यांच्या कार्यकाळात १९६५ मध्ये भारताने पाकिस्तान सोबत एक आक्रमकता चा सामना केला. त्यांनी पाकिस्तान विरुद्ध कारवाई करण्यासाठी सेनेला स्वतंत्रता दिली आणि देशात अधिक लोकप्रियता मिळवली. २३ सप्टेंबर १९६५ ला भारत पाकिस्तान युद्ध समाप्त झाले.
लाल बहादूर शास्त्री यांचा रहस्यमय मृत्यू
१० जानेवारी १९६६ ला रशिया आणि अमेरिका च्या दबावाखाली लाल बहादूर शास्त्री भारत-पाकिस्तान शांती करारावर स्वाक्षरी करण्यास तयार झाले. पाकिस्तान चे राष्ट्रपती अयुब खान आणि भारताचे प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांची भेट रशियातील ताश्कंद मध्ये झाली. असे म्हटले जाते की त्यांच्यावर दबाव टाकून हस्ताक्षर करण्यास सांगितले गेले. ११ जानेवारी १९६६ मध्ये कराराच्या रात्री अतिशय रहस्यपूर्ण पद्धतीने त्यांचा मृत्यू झाला. त्या वेळी सांगण्यात आले की त्यांची मृत्यू हृदयविकाराने झाली. परंतु त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले नाही. विशेष म्हणजे भारताच्या जातीय विषमते विरुध्द व राजकिय एकाधिकारशाही विरुध्द लढणार्या अनेक महान नेत्यांचे मृत्यु हे रहस्यमयरित्याच होतात. व त्यांचा कुठलाही शोध नंतर केला जात नाही. एखाद्या व्यक्तीचे विचार संपवायचे असतील तर त्याला देवत्व प्राप्त करुन द्यायच म्हणजे त्या महान नेत्याचा मानवी मुल्यांचा विचार बंदिस्त करता येतो या अन्यायी न्यायाने त्यांचे पुतळे बांधुन त्यांना देवत्व प्राप्त करुन दिल जात. हिच बाब भारताच्या आजच्या सरसकट र्हासाला कारणीभूत आहे.
असेही म्हटले जाते की लालबहादूर शास्त्री यांच्या भोजनात विष मिळवण्यात आले होते. परंतु पाकिस्तान, अमेरिका आणि रशिया यांच्या भीतीने भारताने त्या वेळी कोणतीही विरुद्ध कारवाई केली नाही. शास्त्री यांचा शासन काळ १८ महिन्याचा होता, त्यांच्या मृत्यू नंतर गुलजारी लाल नंदा यांना देशाचे पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले. लाल बहादूर शास्त्री यांना मृत्यू नंतर १९६६ मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्यात आला. शास्त्री एक महान, निष्ठावान आणि सक्षम व्यक्तीचा रूपात ओळखले जातात. ते महान आंतरिक शक्ती सोबत, विनम्र, सहनशील व्यक्ती होते.
भारतीय ईतिहासातील एक महान पर्व लाल बहादूर शास्त्री एक महान, निष्ठावान आणि सक्षम व्यक्तीमत्वाच्या प्रेरणादायी स्मृतिस विनम्र अभिवादन.
लेखन, प्रसारक,
द्रौपदीपुत्र दीपक धाकु गायकवाड
संविधान साक्षरता अभियान
दक्ष मुंबईकर समिती DMS

Post a Comment
0 Comments