उद्योजक, प्राणीमित्र आणि सामाजिक कार्याची दखल; ‘भाकरमित्र’ सन्मानपत्राने गौरव
रत्नागिरी | प्रतिनिधी
मु. पो .कोंड्ये, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी यांचे सुपुत्र आणि लांजा तालुका बौद्धजन मंडळाचे सचिव श्री. सचिन सदाशिव जाधव यांना उत्कृष्ट उद्योजक, प्राणीमित्र आणि सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय कष्टकरी रयत सेवा संस्था, भाकर (भाकर सेवा संस्था) यांच्या वतीने त्यांना ‘भाकरमित्र’ सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
सामाजिक बांधिलकी जपत समाजहितासाठी केलेल्या कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला. उद्योजकीय क्षेत्रातील कार्यासोबतच प्राणिमात्रांप्रती असलेली संवेदनशीलता आणि सामाजिक कार्यातील सहभाग यांमुळे सचिन जाधव यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
लांजा तालुका बौद्धजन मंडळाचे सचिव म्हणून ते सामाजिक आणि संघटनात्मक कार्यात सक्रिय आहेत. समाजातील विविध घटकांच्या प्रश्नांबाबत जागरूकता निर्माण करणे, सामाजिक बांधिलकी जपणे आणि समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देणे, या कार्याला या सन्मानामुळे प्रोत्साहन मिळाले आहे.
रत्नागिरी येथे दिनांक २४ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रदान करण्यात आलेल्या या सन्मानपत्रावर संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती मंगल पोवार आणि सचिव श्रीमती अश्विनी मोरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सचिन जाधव यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल त्यांचे सामाजिक, बौद्धजन आणि विविध क्षेत्रांतील सहकारी यांच्याकडून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Post a Comment
0 Comments