नवी मुंबई | प्रतिनिधी
नेरुळ, नवी मुंबई : बुद्ध, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी विचारांचा जागर करणाऱ्या कोकणातील आंबेडकरी शाहिरी परंपरेसाठी एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. परिवर्तन धम्म प्रचार संस्था (नोंदणीकृत), नेरुळ, नवी मुंबई यांच्या ९व्या वर्धापन दिनानिमित्त प्रथमच मुंबई नगरीत प्रज्ञा कलामंच कलानिकेतन आंबेडकरी जलसा, रत्नागिरी यांचे पदार्पण होत आहे. रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात हा कार्यक्रम रंगणार आहे.
सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, कला, क्रीडा आणि पर्यावरण अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या परिवर्तन धम्म प्रचार संस्थेची स्थापना दिवंगत बौद्धरत्न एन. पी. मोहिते (गुरुजी) यांनी केली होती. त्यांनी रुजविलेल्या सामाजिक कार्याच्या विचारांचा आणि परिवर्तनवादी ध्येयधोरणांचा वारसा पुढे नेण्याचे कार्य संस्था सातत्याने करीत आहे. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष शोकेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि सभासद यांच्या सामूहिक सहकार्याने संस्थेचा ९वा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सामाजिक बांधिलकी जपत समाजप्रबोधन, समता आणि परिवर्तनाच्या विचारांना चालना देणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोकणातील आंबेडकरी शाहिरीची समृद्ध परंपरा, महापुरुषांचे विचार, सामाजिक प्रबोधन आणि परिवर्तनाचा संदेश नवी मुंबईतील रसिकांपर्यंत पोहोचणार आहे.
दिवंगत ज्येष्ठ कलावंत नागेश देवराम जाधव यांनी निर्माण केलेल्या प्रज्ञा कलामंच कलानिकेतन आंबेडकरी जलसा, रत्नागिरी या कलामंचाच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून बुद्ध, फुले आणि आंबेडकरी विचारधारेचा प्रसार केला जात आहे. गीत, संगीत, शाहिरी आणि नाट्यकलेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा विचार लोकांपर्यंत पोहोचविणे हे या कलापरंपरेचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे.
परिवर्तन धम्म प्रचार संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त या कलामंचाला मुंबईत सादरीकरणाची संधी मिळत असून, हा सोहळा आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीसाठी विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजक व निर्माते म्हणून आदरणीय शोकेश मोहिते साहेब आणि त्यांचे सहकारी पुढाकार घेत आहेत.
‘बुद्ध-भीम गीतांचा संग्राम’ ठरणार प्रमुख आकर्षण
कार्यक्रमात ‘बुद्ध-भीम गीतांचा संग्राम’ हा शाहिरी जलसा सादर करण्यात येणार आहे. बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा गीत-संगीतातून जागर करणाऱ्या या सादरीकरणात गायक आशुतोष जाधव आणि गायिका सानिया नाक्ते सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमातील विशेष आकर्षणांमध्ये भगवान बुद्ध यांच्या भूमिकेत ऋषिकेश मोहिते, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत राकेश जाधव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेत मयूर जाधव दिसणार आहेत.
‘परिवर्तन’ दोन अंकी सामाजिक नाटकाचे सादरीकरण
शाहिरी जलशासोबतच आशुतोष अजित जाधव लिखित, दिग्दर्शित आणि प्रमुख संचालित ‘परिवर्तन’ हे दोन अंकी सामाजिक नाटक सादर करण्यात येणार आहे.
सामाजिक आशय, प्रबोधन आणि परिवर्तनवादी विचारांची मांडणी करणाऱ्या या नाट्यप्रयोगातून समाजातील विविध प्रश्नांवर भाष्य केले जाणार आहे. शाहिरी जलसा आणि सामाजिक नाटक यांच्या संगमामुळे कार्यक्रमाला सांस्कृतिक तसेच वैचारिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
कलाकार आणि तंत्रज्ञांचा सहभाग
या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रांतील कलाकार, वादक आणि तंत्रज्ञ एकत्र आले आहेत.
संगीत व वाद्यवृंद :
- कीबोर्ड : वैभव जोशी
- हार्मोनियम : गौतम कांबळे
- ढोलकी : संगम पवार, मयूर गमरे
- ऑक्टोपॅड : प्रदीप वर्तक
- कडी : रितेश कांबळे
- खंजिरी : साहिल गमरे
- झांज : सुरज कांबळे
मार्गदर्शक :
- आयु. सुरेश करबुडकर
- आयु. भीमदास कदम
- आयु. संजय पवार
- आयु. चंद्रमणी कदम
कोरस गायक : शशिकांत सावंत, सुरज कांबळे, देवेंद्र गमरे आणि विनय सावंत.
नाट्य कलाकार :
- नाट्य अभिनेत्री : कु. वृषाली गिध
- कलाकार : आशुतोष जाधव, रितेश कांबळे, सुरज कांबळे, शशिकांत सावंत, विनय सावंत आणि देवेंद्र गमरे
- सहकलाकार : अनिल कांबळे, प्रेरणा जाधव व इतर कलाकार.
तांत्रिक व रंगमंचीय सहकार्य :
- नाट्य संगीत : महेंद्र मांजरेकर
- ध्वनी व्यवस्था : वैष्णवी साउंड
- नेपथ्य : उल्हास सुर्वे
- प्रकाश योजना : दिलीप कोळी
- रंगभूषा : शितल जाधव
- वेशभूषा : सुरेश जाधव आणि संजय पवार
- सूत्रधार : स्वप्नील जाधव
रंगमंच व्यवस्थापनासाठी विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी यांचे सहकार्य लाभणार आहे.
परिवर्तनवादी विचारांच्या प्रसारासाठी सांस्कृतिक उपक्रम
परिवर्तन धम्म प्रचार संस्था सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, कला-क्रीडा आणि पर्यावरण क्षेत्रांत कार्यरत आहे. संस्थेची स्थापना दिवंगत बौद्धरत्न एन. पी. मोहिते (गुरुजी) यांनी केली होती. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
बुद्ध, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या लोककलांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, तसेच नव्या पिढीपर्यंत सामाजिक समतेचा संदेश पोहोचविणे, हा अशा उपक्रमांचा महत्त्वपूर्ण उद्देश आहे.
कोकणातील आंबेडकरी शाहिरी परंपरेचे मुंबईतील सादरीकरण आणि ‘परिवर्तन’ नाटकाची मेजवानी यामुळे हा कार्यक्रम सांस्कृतिक क्षेत्रातील रसिकांसाठी आकर्षण ठरणार आहे.
📍 कार्यक्रमाची संपूर्ण माहिती
कार्यक्रम : परिवर्तन धम्म प्रचार संस्थेचा ९वा वर्धापन दिन सोहळा
दिनांक : रविवार, १८ ऑक्टोबर २०२६
वेळ : सायंकाळी ठीक ७ वाजता
स्थळ : विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी, नवी मुंबई
प्रमुख सादरीकरण : प्रज्ञा कलामंच कलानिकेतन आंबेडकरी जलसा, रत्नागिरी
शाहिरी जलसा : ‘बुद्ध-भीम गीतांचा संग्राम’
सामाजिक नाटक : ‘परिवर्तन’ – दोन अंकी नाटक
प्रवेश शुल्क : ₹१५० आणि ₹२००
संपर्क : ९७०२७३१००८ | ९३२६१६१८७६ | ९५४५०३३९६३ | ९९२०९२४३१५
समतेचा विचार, शाहिरीचा हुंकार आणि परिवर्तनाचा जागर!
कोकणातील आंबेडकरी जलशाची परंपरा, बुद्ध-भीम गीतांचा निनाद आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश अनुभवण्यासाठी नवी मुंबईतील नागरिक, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, विद्यार्थी, कलाप्रेमी आणि सर्व परिवर्तनवादी विचारांच्या नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments