Type Here to Get Search Results !

आ. मोहितेआंबेडकरी जलशाचा ऐतिहासिक गौरव! आ. मोहिते साहेबांच्या सामाजिक कार्याला मानाचा सलाम!!


 आ. मोहिते साहेब...... अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!! साहेब, आज आम्हांला सांगायला अभिमान वाटतो कि, आपण सामाजिक क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल टाकलं आहात. तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. या भारत भूमीत 2500 वर्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माचं पुनरजीवन करून जी धम्म क्रांती केली त्या धम्माक्रांतीचे विचार खेड्या... पाड्यात पोहचवायचं काम जलसा या माध्यमाने केलं आहे. जलस्यातून हजारो कवी, गायक, लेखक जन्माला आलेत. या साऱ्यांनी आयुषपणाला लावलं. त्या मुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहचविता आले. हे काम आपल्याला अखंडितपणे निरंतर करावयाचे आहे. हा प्रवास युगेनयुगेचा आहे. आंबेडकरी जलसा कोकणातील गावापर्यन मर्यादित होता.आंबेडकरी जलसाला राजमान्यता मिळावी म्हणून कोकणातून जोरदार प्रयत्न सुरु आहे. ही प्रक्रिया सुरु असताना ' परिवर्तन धम्म प्रचार संस्था रजि. या संस्थेच्या 9 व्या वर्धापन दिनानिमित्त आ. सुरेश करबूडकर ( सूत्रधार ) तसेच आ. शोकेसजी संस्थेचे संस्थापक या नात्याने नवी मुंबई ' विष्णुदास भावे या नाट्य गृहात जलसाच सादरीकरण केलं ही आपली ऐतिहासिक कामगिरी आहे. आपण जलसाला उतुंग शिखरावर नेऊन ठेवल. हे केवळ आणि केवळ साहेब तुमच्यामुळेच घडू शकलं. न भूतो न भविषति असा हा ऐतिहासिक सोहळा यासाठी आपण व माझे मित्र आ. सुरेश करबूडकर आपली संपूर्ण टीम ने खूप कष्ट सोसलेत. उन्हा तान्हातून अविरत काम करत राहिलात. याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.मोहिते साहेब.... आपल्या सामाजिक कर्तृत्वाला सलाम....., तसेच समाजातील 22 मान्यवरांना बौधरत्न N. P. मोहिते ( गुरुजी ) स्मुर्ती पुरस्काराने ( 2026 ) सन्मानित केलं गेलं आहे. आपल्या संस्थेचं कार्य महान आहे. आपल्या संस्थेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात...... दऱ्या खोऱ्यात निनादत आहे. आपल्या कर्तृत्वाचा गंध असाच दरवळत रहाओ. आपल्याला उत्तम आरोग्य लाभो..... आपल्याला सुख समृद्धीचे जीवन लाभो..... अशी 🌹🌹 भ. बुद्ध चरणी प्रार्थना 🌹🌹 🙏

Post a Comment

0 Comments