Type Here to Get Search Results !

अजिंक्य आर्ट अकादमीच्या सचिवपदी सुरेश जाधव यांची नियुक्ती


पनवेल: अजिंक्य आर्ट नवी मुंबई पनवेल कला, क्रीडा, सांस्कृतिक अकादमी या संस्थेच्या सचिवपदी सुप्रसिद्ध कलाकार सुरेश वनिता महादेव जाधव (करबुडकर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


या नियुक्तीबद्दल त्यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत. माझे स्नेही आदरणीय नंदू कोळी सर यांनी माझ्यावर सोपविलेली जबाबदारी मी निष्ठेने व यशस्वीरित्या पार पाडेन, असे प्रतिपादन सुरेश जाधव यांनी केले आहे.


त्यांच्या या नियुक्तीबद्दल सर्व स्तरातून त्यां


चे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments