मुंबई | १४ ऑगस्ट २०२६.
स्वातंत्र्य दिनानंतर रस्त्यावर, पदपथावर किंवा कचऱ्यात राष्ट्रध्वज पडलेले आढळू नयेत आणि राष्ट्रध्वजाचा सन्मान राखला जावा, यासाठी दक्ष मुंबईकर समिती (DMS) यांच्या वतीने १४ ते १६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘राष्ट्रध्वज सन्मान अभियान’ राबविण्यात येत आहे.या अभियानांतर्गत नागरिक, सोसायट्या, संस्था आणि मंडळांनी आपल्या परिसरात किमान १ × १ फूट आकाराचा ‘राष्ट्रध्वज सन्मान बॉक्स’ ठेवावा. परिसरात पडलेले राष्ट्रध्वज आदराने गोळा करून या बॉक्समध्ये जमा करण्याचे आवाहन समितीने केले आहे.मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर, मीरा-भाईंदर आणि वसई-विरार परिसरातील नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.गोळा केलेल्या राष्ट्रध्वजांची Flag Code of India, 2002 मधील तरतुदींनुसार सन्मानपूर्वक विल्हेवाट लावणे अपेक्षित आहे. खराब किंवा मळलेला राष्ट्रध्वज प्रदर्शित करू नये. कागदी राष्ट्रध्वजही रस्त्यावर किंवा जमिनीवर टाकण्याऐवजी ध्वजाच्या प्रतिष्ठेला सुसंगत पद्धतीने विल्हेवाट लावावी, असे समितीने स्पष्ट केले आहे.विल्हेवाटीची प्रक्रिया सार्वजनिक प्रदर्शन किंवा उत्सवाचे स्वरूप देऊन करू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.
अभियानातील सहभागाची नोंद
अभियानात सहभागी नागरिक व संस्थांनी गोळा केलेल्या राष्ट्रध्वजांचे दोन फोटो आणि विल्हेवाटीचा एक फोटो १७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ८६९१९१५८७७ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावा.अभियानात सहभागी होणाऱ्या व्यक्ती, संस्था व मंडळांना Certificate of Appreciation देण्यात येणार असून, परिसरात प्रभावीपणे आणि मोठ्या प्रमाणावर अभियान राबविणाऱ्या संस्थांचा विशेष सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे.“राष्ट्रध्वज रस्त्यावर पडू देऊ नका — सन्मानाने उचलून योग्य ठिकाणी जमा करा!”असा संदेश देत “राष्ट्रध्वजाचा सन्मान — प्रत्येक भारतीयाची जबाबदारी” या भावनेतून नागरिकांनी अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन दक्ष मुंबईकर समिती – DMS यांनी केले आहे.
📱व्हॉट्सॲप लिंक संपर्क :
या लिंकवर क्लिक करा,
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeE9JHtUt6vb4tC9pzATF4tfMx-vjaYflJtryx1MsR9_IhWsQ/viewform?usp=publish-editor
अधिक माहितीसाठी सपर्क साधा.
मुंबई शहर - 8691915877
डोंबिवली - 8898158006
मुंबई उपनगर - पूर्व । पच्छिम. - 99303 33879
घाटकोपर पूर्व - 9821220534
घाटकोपर पच्छिम - 9594700866
भटवाडी - घाटकोपर प. - 92233 66323
पारसेवाडी,असल्फा व्हिलेज घाटकोपर प. - 8655055057
माता रमाबाई आंबेडकर नगर, कामराज नगर - 9867611187
पार्क साईट. विक्रोळी प. - 93240 13228
टागोर नगर, कन्नमवार नगर - 92268 80349
नवी मुंबई - 9967710866
पनवेल - 9702262353
भांडूप - मुलुंड-पच्छिम
9969813577
मुलुंड पूर्व - 9892872873
भांडूप पू.7738378872
वडगादी,कर्नाक बंदर,कुलाबा - 7208231194
करीरोड,लालबाग,भायखाळा - 8451835006
प्रभादेवी,करीरोड,वरळी - 7977662430
आयोजक :
दक्ष मुंबईकर समिती – DMS
संदर्भ : Flag Code of India, 2002 व Prevention of Insults to National Honour Act, 1971 — भारत सरकार, गृह मंत्रालय

Post a Comment
0 Comments